कन्हान ला बुद्ध पोर्णिमा थाटात साजरी शहर विकास मंच द्वारे बुद्ध पोर्णिमा थाटात

कन्हान : – तथागत गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे नाका नं. सात येथील सुजाता बुद्ध विहारात ला तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पित करून बुद्ध वंदनेसह अभिवादन करित बुद्ध पोर्णिमा थाटात साजरी करण्यात आली.
बुधवार (दि.२६) मे २०२१ ला बुद्ध पौर्णिमा निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन नाका नं. सात सुजाता बुद्ध बिहारात मंच महासचिव संजय रंगारी यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्या त आली. यावेळी मंच अध्यक्ष प्रविण गोडे व मंच सचिव प्रदीप बावने हयांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व मंच पदाधिका-यांनी बुद्ध वंदनेसह तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत बुद्ध पोर्णिमा थाटात साजरी करण्यात आली. याप्रसं गी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ॠषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, महा सचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, प्रकाश कुर्वे, सोनु खोब्रागडे सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.
बोधी वृक्ष वाटप करून बुद्ध पोर्णिमा साजरी
कन्हान : – बुद्ध पौर्णिमा व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्य कन्हान येथील समाज बांधवांनी आंबेडकर चौक कन्हान येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते बोधी वृक्षाचे (पिंपळाचे) वाटप करून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्या त आली. याप्रसंगी कन्हान ठाणेदार अरूण त्रिपाठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर भिमटे, रमेश गोडघाटे, शालीकराम महाजन, शरद गिते, मोरेश्वर खडसे, अशोक पाटील, नरेश सोनेकर, निखिल रामटेके, पंकज रामटेके, प्रमोद मालाधरे, अभिजित चांदुरकर, अजय चौहान, कुणाल खडसे सहित पोलीस व समाज बांधव उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535