हेडलाइन

कन्हान ला बाॅटम सर्विस विधृत तारा चा शॉक लागुन गवंडी (मिस्त्री) कामगाराचा मुत्यु…

Summary

कन्हान ला बाॅटम सर्विस विधृत तारा चा शॉक लागुन गवंडी (मिस्त्री) कामगाराचा मुत्यु   कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत एक किमी अंतरा वर उत्तर भागात असलेल्या अशोक नगर कन्हान येथे एका गवंडी (मिस्त्री) कामगार भिंत प्लॉस्टर करताना बाॅटम चा […]

कन्हान ला बाॅटम सर्विस विधृत तारा चा शॉक लागुन गवंडी (मिस्त्री) कामगाराचा मुत्यु

 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत एक किमी अंतरा वर उत्तर भागात असलेल्या अशोक नगर कन्हान येथे एका गवंडी (मिस्त्री) कामगार भिंत प्लॉस्टर करताना बाॅटम चा विधृत ताराला स्पर्श होऊन शॉक लागुन मुत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलीस कडुन प्राप्त माहिती नुसार मृतक अशोक महाजन पगरवार अंदाजे वय २६ वर्ष राह. वार्ड क्र. १ इंदिरा नगर कांद्री हा घर बांधकामाचे गवंडी (मिस्त्री) चे काम करतो. शनिवार (दि.११) डिसेंबर २०२१ ला सायंकाळी ४:३० ते ५ वाजता दरम्यान मृतक अशोक महाजन पगरवार हा जुगाळावर उभे राहुण सहा फुटा च्या बाॅटम ने भिंतीला प्लाॅस्टर करीत असतांना बाॅटम चा विधृत सर्विस ताराला स्पर्श होऊन विधृत शॉक लागुन खाली पडल्याने त्यास उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेले असता डाॅक्टरने तपासु न मृत घोषित केले. सदर मृतकाच्या मरणाला घरमाल क धनराज बातुलवार, ठेकेदार सुधाकर मेश्राम यांच्या निष्काळजीपणामुळे व कोणत्याही प्रकारचे सुरक्षित तेचे साधन न वापरल्यामुळे अशोक पगरवार यांस विधृत शाॅक लागुन मुत्यु झाला आहे. अश्या फिर्यादी आशिष अजबराव बैठवार वय २१ वर्ष राह. वार्ड क्र. १ इंदिरा नगर कांद्री यांच्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अप क्र. ४८/२०२१ कलम १७४ जाफौ कायदान्वये मर्ग दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे हवालदार खुशाल रामटेके, मंगेश ढबाले हे करीत आहे.

संजय निंबाळकर

राज्य चिफ ब्युरो

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *