कन्हान येथे विरांगना अवंतीबाई लोधी यांची १९० वी जयंती साजरी
कन्हान येथे विरांगना अवंतीबाई लोधी यांची १९० वी जयंती साजरी
कन्हान : – लोधी समाज संघटन कन्हान द्वारे विरांगना अवंतीबाई लोधी यांची १९० वी जयंती निमित्य पिपरी कन्हान रोड वरील जिल्हा परिषद शाळा पिपरी च्या परिसरात विरांगना अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत जयंती साजरी करण्यात आली.
सोमवार (दि.१६) ऑगस्ट २०२१ ला कन्हान येथील लोधी समाज संघटने द्वारे विरांगना अवंतीबाई लोधी यांची १९० वी जयंती निमित्य पिपरी – कन्हान रोड वरील जिल्हा परिषद शाळा पिपरी च्या परिसरात विरांगना अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला राष्ट्रीय प्रचार समिती संयोजक व सचिव श्रवण वतेकर यांच्या हस्ते माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून विरां गना अवंतीबाई लोधी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवाद न केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी विरांग ना अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी डॉ सेवकराम बिलोने, मुलचंदजी शिंदेकर, गजानन खांडेकर, जिवन लिल्लारे, केसरीचंद खंगारे, तुलशीराम खंगारे, रोशनी खंगारे, चंद्रकलाबाई लोधी, संगीताबाई निंबोने, संगीता खंगारे, अर्चना लोधी, गणपती दमाहे, महादेव लिल्हारे, किरण ठाकुर, गणेश लोधी, हरीश्चंद्र जामखुरे सह नाग रिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यश स्वितेकरिता दामोदर निंबोने, महावीर खंगारे, लोकेश दमाहे, रंजित शिंदेकर, रविंन्द्र बघेले, फजित खंगारे, रोशन पटेल, नरेंद्र सोलंकी, विष्णु निंबोने, मनोहर लोधी, लक्ष्मीकांत कमाले, प्रदीप ठाकुर, संजय लोधी, बंसीलाल अकोने, ओमप्रकाश निंबोने आदीने सहकार्य केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535