हेडलाइन

कन्हान नदीवरील नवीन पुल तातडीने पुर्ण करा…

Summary

कन्हान नदीवरील नवीन पुल तातडीने पुर्ण करा…   #) संथगतीने होणाऱ्या कामाबद्दल मनसेचा आक्रमक पवित्रा.   कन्हान : – महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर तर्फे कन्हान ते कामठी येथील कन्हान नदीवर सुरू असले ल्या नवीन पुलाच्या रखडलेल्या कामाबद्दल आक्रमक भुमिका घेत […]

कन्हान नदीवरील नवीन पुल तातडीने पुर्ण करा…

 

#) संथगतीने होणाऱ्या कामाबद्दल मनसेचा आक्रमक पवित्रा.

 

कन्हान : – महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर तर्फे कन्हान ते कामठी येथील कन्हान नदीवर सुरू असले ल्या नवीन पुलाच्या रखडलेल्या कामाबद्दल आक्रमक भुमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित कार्यकारी अभियंता श्री नरेश बोरकर यांच्या कार्याल यात धडक देऊन संथगतीने सुरू असलेल्या कामा बद्दल तीव्र आक्षेप घेत. तातडीने या पुलाचे काम पुर्ण करून जनतेला रहदारीस खुला करावा अश्या आशया चे निवेदन मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे शिष्टमंडळाने या विष यावर चर्चा करून सादर करण्यात आले.

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर कन्हान स्थित असलेला जुना ब्रिटिशकालीन पुलाची काल मर्यादा संपुन ४० वर्षे लोटली आणि नवीन पुलाच्या निर्माणकार्याला सुरू होऊन ७ वर्षे झाली तरी अद्याप ही याचे काम पुर्ण झाले नाही. कालमर्यादा बाह्य झाले ल्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर रहदारीचा तसेच जड वाहतुकीचा प्रचंड बोझा वाढलाय, जुन्या पुलाची क्षमता संपलीय, कधीही मोठी दुर्घटना घडु शकते, जवळच्या राज्याच्या भागातुन या मार्गाने अनेक नाग रिक नागपुरात उपचारांसाठी येत असतात या जुन्या छोट्या पुलावरील व्यस्त वाहतुकीमुळे येणाऱ्या रूग्ण वाहीका सुध्दा या ठिकाणी अडकुन पडतात, यामुळे रूग्णाना उपचारासाठी विलंब होतो. यावर तेथील स्थानिक प्रशासनाची व पोलीस विभागाची मदत घेऊ न येथील रहदारी नवीन पुल बनुन सुरू होई पर्यंत सुरक्षितरित्या होईल अशी व्यवस्था तातडीने करा अशीही मागणी मनसे शिष्टमंडळाने रेटुन धरली. आपली मागणी रास्त आहे, याची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करतो. काही तांत्रिक बाबीमुळे नवीन पुलाचे कार्य प्रलंबित राहिले असले तरी येणाऱ्या तीन महिन्यात नवीन पुल जनतेच्या रहदारीसाठी सुरू करू असे आश्वासन यावेळी कार्यकारी अभियंता श्री नरेश बोरकर यांनी मनसे शिष्टमंडळाला दिले. यावेळी प्रामु ख्याने मनसे शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे , शहर उपाध्यक्ष रजनीकांत जिचकार, शहर सचिव घनश्याम निखाडे यांचे सह या निवेदनासाठी पुढाकार घेणारे जनहित सेलचे जिल्हाध्यक्ष इकबाल रिझवी, महिला सेना जिल्हाध्यक्षा सौ. कल्पना चव्हाण, विद्या र्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश इलमे, मनविसे उत्तर विभाग अध्यक्ष मनोज कहाळकर, मोरेश्वर कट्यारमल, , विनेश ग्रेगरी, ईजाज शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संजय निंबाळकर

राज्य चिफ ब्युरो

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *