कन्हान नगर परिषद द्वारे महिला दिवस थाटात साजरा

कन्हान नगर परिषद द्वारे महिला दिवस थाटात साजरा
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा केला सत्कार.
कन्हान : – नगरपरिषद द्वारे जागतिक महिला दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन नवीन प्रशासकीय इमारत येथे करण्यात आले असुन कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते महान स्त्रियांच्या प्रतिमेचे पुजन करून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला.
. मंगळवार (दि.८) मार्च ला जागतिक महिला दिवस निमित्य कन्हान-पिपरी नगरपरिषद द्वारे नवीन प्रशासकीय इमारत येथे नगराध्यक्षा करूणा ताई आष्टणकर यांच्या अध्यक्ष व प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी रामटेक मा. वंदना सवरंगपते यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी उपविभा गीय अधिकारी रामटेक मा. वंदना सवरंगपते, बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके, नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर आदीनी महिला दिवसा निमित्य उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित महिला बचत गट, आशा वर्कर सेविका, अंगणवाडी सेविका, महिला सफाई कर्मचारी, विधवा महिला व शहरातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा वृक्ष, शाॅल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात माझी वंसुधराची शपथ घेण्यात आली. राष्ट्रगीत गायन करून उपस्थित सर्व महिलांना अल्पोहार वितरित करून जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला. यावेळी कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी, डॉ आयुषी चौधरी, नगरसेविका मौनिका पौणिकर, संगीता खोब्रागडे, सुषमा चोपकर, रेखा टोहणे, कल्पना नितनवरे, अनिता पाटील, वंदना कुरडकर, वर्षा लोंढे, मनिषा चिखले, लता लुंढेरे, मनिषा बेले कन्हान-पिपरी नगरपरिष देचे संकेत तालेवार, शुभम येलमुले, शुभम कळबांडे, आशिष पात्रे सह नप अधिकारी, कर्मचारी व महिला बहु संख्येने उपस्थित होते.
देशाच्या विकासात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान – रश्मी बर्वे जि प अध्यक्षा
#) अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला मेळाव्यात प्रतिपादन.
कन्हान : – अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जि ल्हा नागपुर द्वारे ८ मार्च २०२२ ला जागतिक महिला दिनाचे औचित्याने जागतिक महिला दिन व पुरस्कार वितरण सोहळा विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मोरभव न झाशी राणी चौक सिताबर्डी नागपुर येथे जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे, उपाध्यक्ष सुमित्राताई कुंभारे, शिक्षण समिती सदस्य शांताबाई कुमरे, शिक्षक नेते गोपालराव चरडे, रामु गोतमारे, सुनिल पेटकर, सुभाष गायधने, जिल्हाध्य क्ष धनराज बोडे, कार्याध्यक्ष गिरडकर, सरचिटणीस विरेंद्र वाघमारे, महिला प्रमुख आशा झिल्पे, महिला सेल सचिव सिधु टिपरे,उपाध्यक्ष श्वेता कुरझड कर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संघटने तर्फे उपस्थित मान्यवर पदाधि कारी यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
अखिल संघटने द्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षां निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवर पदाधिकाऱ्यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व महिला शिक्षिकांना भेट वस्तु देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी रामु गोतमारे, सुनिल पेटकर, आशा झिल्पे, सिंधु टिपरे यांनी संबोधीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज बोडे, संचालन विरेंद्र वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन आनंदराव गिरडकर यांनी केले.