*कन्हाननदी पुलाची व महामार्गाची देखरेख करून संरक्षण करा* कन्हान रेल्वे लाईन वरील गड्डे अपघातास निमत्रंण रेल्वे व पी डब्लु डी प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष.
*नागपूर* कन्हान : – नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ च्या कन्हान शहरात प्रवेश करतांनी पडत असले ला रेल्वे क्राॅसिंग जवळ मोठ मोठे गड्डे पडल्याने वाहना चा अपघात होऊन मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्य ता नाकारता येत नाही. यास्तव या कडे कन्हान रेल्वे व पी डब्लु डी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांची चिंता वाढली असुन जड वाहतुकीने कन्हान नदी पुला ला सुध्दा धोका निर्माण होत असल्याने पुलाची व महामार्ग रस्त्याची देखरेख करून सुरक्षित करा.
कन्हान नदी वरील मोठा पुल ब्रिटीश कंपनीने बांधकाम केले. असुन कन्हान नदी पुलाची काल मर्यादा १०० वर्ष ओलांडुन सध्या १४६ वर्ष पुर्ण होऊन जिर्ण अवस्थेत असुन सुध्दा बस , टॅव्हल्स, चार चाकी, मोटार सायकल व इतर जड वाहनांचे दररोज मोठया प्रमाणात वाहतुक सुरु आहे . या पुला वरुन दहा, बारा चाकी कोळसा, गिट्टी, रेती व इतर जड वस्तु ची वाहतुकीने आणि रेल्वे फाटक बहुतेक वेळी बंद होऊन वाहनाच्या रांगाच रांगा पुलावर सुध्दा लागुन पुलाला सुध्दा कमकुवत करित असुन फाडक उघल्या वर वाहनाची चांगलीच पळापळी असते. या जड वाहुकीने रेल्वे फाटकाच्या रसत्यावर गड्डेच गड्डे पडुन वाहनाच्या अपघातास निमत्रंण देत आहे. साई मंदीर ते कन्हान रेल्वे फाटका पर्यंत रस्ता उंच बाजुला खोलगट जागा ही वाहन चालकांना चांगलाच मनस्ताप करित आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला व पुलावर झाडीझुडपी वाढल्याने त्रासदायक ठरत आहे. कन्हान नदीचा वर्दळीचा पुल शेवटची घटका मोजत असताना सुध्दा संबंधित अधिकारी दुर्लक्ष करणे चिंतेची बाब आहे. या रस्त्याच्या देखभाल व दुरूस्ती कडे कन्हान रेल्वे व पीडब्ल्युडी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने मोठा अपघात व दुर्घटनेची दाट शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसा पुर्वी जिल्हाधिकारी व्दारे कन्हान पुला वरुन जड वाहनास प्रतिबंध लावण्यात आला. तसेच फलक सुध्दा लावलेले आहे. परंतु स्थानिय प्रशासना व्दारे अमलबजावणी करण्यात येत नसल्याने बिनधास्त जड वाहतुक सुरू असणे पुलाला भयंकर धोकादायक ठरत आहे. या सर्व गंभीर समेस्येवर गांभिर्याने संबधित अधिकारी, प्रशासन लक्ष देत नसेल तर येथे होणा-या अपघातास व दुर्घटनेस कोण जिमेदार ? अशी चर्चा जोर धरू लागली आहे. यास्तव या विषयी गांभिर्याने लक्ष केंद्रीत करून रेल्वे, पी डब्लु डी आणि शासन प्रशासनाने कन्हान नदी पुल व महामार्ग रस्त्याची नियमित देखभाल दुरूस्ती करण्यात यावी. जेणे करून भविष्यात होणा-या अपघात, दुर्घटनेला प्रतिबंध लावता येईल. अश्या नागरिक व प्रवाशी यांच्या चर्चेतुन समोर येत आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147