हेडलाइन

कन्नमवार वार्डातील ओपन स्पेस चा उद्दार केव्हा होणार ? वार्ड वासियांची नगरपरिषदेला विचारणा

Summary

कन्नमवार वार्डातील ओपन स्पेस चा उद्दार केव्हा होणार ? वार्ड वासियांची नगरपरिषदेला विचारणा   कन्नमवार वार्ड क्रमांक 17 मधील ओपन स्पेस ही शहरातील सर्वात जुनी ओपन स्पेस आहे. शहरातील अगदी अलीकडे तयार झालेल्या ओपन स्पेस चा विकास झाला , सुंदर […]

कन्नमवार वार्डातील ओपन स्पेस चा उद्दार केव्हा होणार ?

वार्ड वासियांची नगरपरिषदेला विचारणा

 

कन्नमवार वार्ड क्रमांक 17 मधील ओपन स्पेस ही शहरातील सर्वात जुनी ओपन स्पेस आहे. शहरातील अगदी अलीकडे तयार झालेल्या ओपन स्पेस चा विकास झाला , सुंदर संरक्षण भिंती त्यांचे सुशोभीकरण, बाल उद्याने, वाचनालय/ समाज भवन झालेत, बगीचे निर्माण केलीत, परंतु कन्नमवार वार्ड क्रमांक 17 मधील ओपन स्पेस आजच्या स्थितीला शापीत ओपन स्पेस ठरली आहे. सध्या ती काडीकचरा डुकरे, गुरेढोरे यांच्यासाठी अधिवास झाली आहे. शहरात 1 ते 2 तास सतत पाऊस पडला तर येथे जवळपास दोन ते तीन फूट उंच पाणी जमा होते आणि ते आठ दिवस तिथून निघत नाही त्यामुळे डास, दुर्गंधी यापासून होणाऱ्या आजारांना वार्डातील लोकांना तोंड द्यावे लागते.

यासंदर्भात विद्यमान नगराध्यक्षांचे लक्ष वेधावे म्हणून दोन वर्षांपूर्वी वार्डातील लोकांनी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले होते आणि त्यावेळी त्यांच्या कानावर ह्या समस्या घालण्यात आल्या होत्या. खासदार, नगरसेवक यांनासुद्धा यापूर्वी निवेदने देण्यात आली होती. विद्यमान च नव्हे तर गेल्या पंधरा वर्षांपासून आजी-माजी सर्वच नगरसेवक व नगराध्यक्षांना निवेदने देण्यात आली, परंतु सर्वांनीच या ओपन स्पेस कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. दोन-तीन महिन्यांनी नगरपरिषदेच्या निवडणुका लागणार आहे, आता तरी विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवकाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून या ओपन स्पेस चा उद्धार करावा असे विनंती कन्नमवार वार्डातील रहिवासी चंद्रकांत शिवणकर, राजेंद्र उरकुडे, पुरुषोत्तम मस्के, दादाजी चापले, निलेश डांगे, विवेक हुलके, प्राचार्य मेश्राम, जुवारे साहेब, त्र्यंबक करोडकर, हनुमंत बुरडकर, वासुदेव कुडे , दादाजी चूधरी, बंडू निरगुडवार , मोरेश्वर चौधरी शिवदास वाडकर, राकेश चौधरी, दिलीप म्हशाखेत्री शेषराव येलेकर, प्रा. रमेश सोनटक्के, मोरेश्वर गणवीर कमलाकर रडके, नितीन डांगे, दुर्गे सर, मुडके सर, चुंचूवार साहेब, पिल्लेवान सर, चंद्रशेखर तोटावार, प्रवीण म्हशाखेत्री, प्रफुल येलेकर, प्रदीप देशमुख, बंडू श्रीरामवार इत्यादींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *