हेडलाइन

कत्तल पूर्व तपासणी सेवाशुल्क दोनशे रुपये :जनतेनी सहकार्य करावे  – जिल्हाधिकारी आर. विमला

Summary

कत्तल पूर्व तपासणी सेवाशुल्क दोनशे रुपये :जनतेनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी आर. विमला नागपुर- प्रतिनिधी महाराष्ट्र प्राणी सरंक्षण कायद्यांतर्गत अनुसूचित कत्तल पूर्व तपासणीसाठी प्रती जनावरे दोनशे रुपये सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे. बकरी ईद सण साजरा करणाऱ्या नागरिकांनी सेवाशुल्क भरुन शासनाला […]

कत्तल पूर्व तपासणी सेवाशुल्क दोनशे रुपये :जनतेनी सहकार्य करावे

– जिल्हाधिकारी आर. विमला

नागपुर- प्रतिनिधी

महाराष्ट्र प्राणी सरंक्षण कायद्यांतर्गत अनुसूचित कत्तल पूर्व तपासणीसाठी प्रती जनावरे दोनशे रुपये सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे. बकरी ईद सण साजरा करणाऱ्या नागरिकांनी सेवाशुल्क भरुन शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले.

बकरी ईद साजरी करण्याबाबत नियोजनासाठी जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक कार्यकारी मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. राजेंद्र महल्ले, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विजयसिंग राठोड, अमित कराडे, पोलीस सहाय्यक आयुक्त योगेश मोरे, अशासकीय सदस्य करिश्मा गिलानी, प्रदिप कश्यप यावेळी उपस्थित होते.

23 मे च्या शासन निर्णयानूसार पशुसंवर्धन विभागाच्या सेवाशुल्कात सुधारणा करण्यात आली आहे. अस्थाई स्वरुपाच्या कत्तल खाण्यामधून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यांचे व्यवस्थापन आणि आवश्यक स्वच्छतेचा रखरखाव महानगर पालिकेने करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नागपूर आणि कमठी शहरात तात्पुरत्या स्वरुपाचे अकरा कत्तलखाने प्रस्तावित करण्याचे नियोजित असून कत्तलखान्यावर 9 ते 13 जुलै दरम्यान पशुसंवर्धन विभाग नागपूर तर्फे महाराष्ट्र प्राणी रंक्षण कायद्यामधील सुधारणानूसार अनुसूचित प्राण्यांची कत्तलपूर्व तपासणी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक शहर व तालुकास्तरावर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *