कढोलीत सुवर्णकन्येचं थाटात स्वागत — दुबईतील आशियाई युवा पॅरा गेम्समध्ये श्वेता कोवे चमकली, गावभर जल्लोषाचा माहोल
कढोली (गजानन पुराम)
दुबई येथे ८ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडलेल्या आशियाई युवा पॅरा गेम्स स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावून देशाची प्रतिष्ठा उंचावणाऱ्या श्वेता भास्कर कोवे हिचं आज कढोली गावात प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर, शिक्षण संचालक आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू तसेच अनेक क्रीडा व्यक्तिमत्त्वांनी श्वेताचा गौरव केला. त्यानंतर डिजे–बँडच्या गजरात, खुल्या जीपमधून आष्टीतील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयापासून कढोलीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गावाच्या प्रवेशद्वारापासून रंभा माता मंदिर, हनुमान चौक आणि गावातील प्रमुख मार्गांवरून विजय रॅली फिरली. गावकऱ्यांनी श्वेतावर पुष्पवर्षाव करत, माळांनी सत्कार केला.
श्वेताच्या कामगिरीने प्रभावित होऊन वनवैभव शिक्षण फाउंडेशनचे संचालक बबलू भैया हकीम, दृष्टि फाउंडेशन अहेरीच्या अध्यक्षा शाहीन हकीम, विविध क्रीडापटू व विद्यार्थी यांनीही तिचा सन्मान केला.
या ऐतिहासिक स्वागत सोहळ्यास ग्रामपंचायत सरपंच जितेंद्र हुलके, उपसरपंच अल्का हुलके, सदस्य सुगत बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते योगपती वाकुडकर, पोलीस पाटील संगीता ईजमनकार, नम्रताचांदेकर, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी रिना हुलके, शैलेश हुलके, पंकज हुलके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आष्टी पोलिस स्टेशनच्यावतीनेही अधिकारी व कर्मचारी यांनी श्वेताला शुभेच्छा दिल्या. महसूल विभागातील धनराज भोयर, रोजगार सेवक किशोर चनेकार, ग्रामपंचायत अधिकारी हेमंत गेडाम, सदस्य मंगला कोवे, दिपा वाकुडकर, तसेच कढोलीतील विविध विभागातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गावातील मुली–तरुणांसाठी श्वेताची कामगिरी प्रेरणादायी आदर्श ठरत असून, तिने स्वतःच्या स्टीलसारख्या जिद्दीला कुटुंबीय, मार्गदर्शक आणि गावकऱ्यांचा आधार जोडून हे यश साध्य केलं आहे.
“श्वेताच्या सुवर्णातून कढोलीनं जागतिक मंचावर आपली ओळख निर्माण केली,” अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज — गडचिरोली–चामोर्शी
प्रतिनिधी: गजानन पुराम
मो. ७०५७७८५१८१ / ९४०३६९८२६८
