कचारी सावंगा येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता कोंढाळी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू; नागरिकांना सहकार्याचे आवाहन
कोंढाळी | प्रतिनिधी
कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीतील कचारी सावंगा (ता. काटोल) येथील १४ वर्षे १० महिने वयाचा अल्पवयीन मुलगा निशांत सतीश बानाईत हा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कचारी सावंगा येथील रहिवासी सतीश श्रीधरराव बानाईत (वय ४५) यांचा मुलगा निशांत हा दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १.०० वाजता कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला. त्या दिवशी सतीश बानाईत हे शेतावर कामासाठी गेले असताना, निशांत याने दुपारी १२.३० वाजता जेवणाचा डबा शेतावर पोहोचवून घरी परतला होता. मात्र सायंकाळी ५.३० वाजता वडील घरी परतल्यानंतर निशांत घरी आढळून आला नाही.
कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शेजारील परिसरात सर्वत्र शोध घेऊनही निशांतचा काहीही मागमूस न लागल्याने अखेर कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून अप.क्र. ७४४/२०२५ अन्वये कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौरी एन. उईके करीत आहेत.
बेपत्ता मुलाचे वर्णन
नाव : निशांत सतीश बानाईत
वय : १४ वर्षे १० महिने
उंची : सुमारे ५ फूट १ इंच
रंग : सावळा
चेहरा : लांबट
शरीरयष्टी : सळपातळ
पोशाख : मेहंदी रंगाचा जॅकेट, काळ्या रंगाचा लोअर
ओळख चिन्हे : गळ्यात रुद्राक्षाची माळ, पायात काळी-हिरवी सॅंडल
विशेष खूण : डाव्या पायाच्या घोट्याजवळ खरचटलेली जखम
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
वरील वर्णनाचा मुलगा कोणास आढळून आल्यास किंवा त्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास, तात्काळ पोलीस स्टेशन कोंढाळी येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक :
सपोनि. राजकुमार त्रिपाठी : ९८२३२०७२९६
पो.उपनि. गौरी एन. उईके : ९६९९०६९५८९
पोलिसांकडून सर्व स्तरावर शोधमोहीम सुरू असून, नागरिकांनी संवेदनशीलतेने माहिती देऊन सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
