ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात क्लिनर ठार वरठी जवळील घटना
स्वार्थी करमकर/महिला प्रतिनिधी
भंडारा-तुमसर
मार्गावरील वरठी येथील स्मशानभूमीजवळ. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मागेहुन येणाऱ्या ट्रकने समोरील ट्रकला मागुन धडक दिली.त्यात मागील ट्रकच्या किन्नर चा मृत्यू झाल्याची घटना दि 5 आॅगस्ट 2021 रोजी रात्री 9 च्या दरम्यान घडली . दुर्गेश तरांडै (२५) रा. नागपूर असे मृताचे नाव आहे.
उमरेड येथुन भरुन अदानी पावर प्लांट तिरोडा येथे ट्रक क्र. एम एच बिएल ९५५९ या ट्रक मधील कोळसा खाली केल्यानंतर खापा तुमसर भंडारा मार्ग उमरेड येथे जात असताना दि 5 आॅगस्ट रोजी रात्री 9 वा.दरम्यान वरठी येथील स्मशानभूमीजवळ मागेहुन येणाऱ्या ट्रक क्र एम एच ४९ एटी ९९५९ चा चालक अरविंद्र बेंद्रे याने ट्रक निष्काळजीपणे चालुन समोरील ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरील ट्रकला मागुन धडक दिली. या धडकेत मागील ट्रकला क्लिनर दुर्गेश तरांडै हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती वरठी पोलिसांना मिळताच त्यांनी घटना स्थळ गाठुन जखमी ला उपचारा करिता भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला सदर घटनेचा तपास
वरठी चे पोलिस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सुबोध वंजारी लक्ष्मीकांत कुकडे घनश्याम गोमासे संदीप बांते लांडगे आदी करत आहेत.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर