BREAKING NEWS:
हेडलाइन

ओबीसी समाजाचे आमदार राजुभाऊ कारेमोरे यांना निवेदन

Summary

अमर वासनिक/न्यूज एडिटर या पावसाळी अधिवेशनात ओबीसी  समाजाच्या मागण्या लावून धरण्या बाबत  आमदार राजुभाऊ कारेमोरे यांना निवेदन देण्यात आले.        ओबीसी समाज हा भारतातील मोठया लोकसंख्येचा समाज आहे.भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत या समाजाचा फार मोठा वाटा […]

अमर वासनिक/न्यूज एडिटर

या पावसाळी अधिवेशनात ओबीसी  समाजाच्या मागण्या लावून धरण्या बाबत  आमदार राजुभाऊ कारेमोरे यांना निवेदन देण्यात आले.
        ओबीसी समाज हा भारतातील मोठया लोकसंख्येचा समाज आहे.भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत या समाजाचा फार मोठा वाटा आहे. भारतातील जवळपास 90 टक्के शेतकरी ओबीसी प्रवर्गातील आहेत आणि महाराष्ट्रातील sc st प्रवर्ग वगळता जवळपास 80 टक्के आमदार ओबीसी प्रवर्गातील आहेत. तरीही या प्रवर्गातील जनतेला विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.                          भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसी जनगणना झालीच नाही त्यामुळे शासनाला नियोजन करता आले नाही, या जनगणने मुळे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर पदवी शिक्षणात भरपूर फायदा होऊ शकतो तसेच या समाजाची मानसिकता आणखी स्थिर होण्यास मदत होईल, तसेच जर ओबीसी समाजाला जनगणना होऊन स्थिर आरक्षण मिळाले तर त्याचा फायदा इतर समाजालाही होईल आणि ओबीसी व इतर समाजात सामंजस्य होण्यास मदत होईल’ असे संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष यशवंत भोयर यांनी केले,तसेच जर विद्यार्थी खवळले तर प्रकरण पेटून उठेल असे वक्तव्य संभाजी ब्रिगेड चे शिशुपाल भुरे यांनी केले. सर्वच राजकीय क्षेत्रातील नेते एकत्र आले तर ओबीसी जनगणनेचा प्रश्न सुटू शकतो असे वक्तव्य आमदार राजुभाऊं कारेमोरेंनी केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *