ओबीसी शिष्टमंडळाची ओबीसींचे पदोन्नती मधील आरक्षण बाबत ना. वडेट्टीवार यांचेशी चर्चा
Summary
नुकतेच ओबीसी बहुजन कल्याण मंत्री नामदार विजय वडेट्टीवार हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ओबीसी शिष्टमंडळाने त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ओबीसींच्या पदोन्नती मधील आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली ओबीसी सोडून इतर सर्व मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळते, मात्र ओबीसींना ते मिळत नाही, […]
नुकतेच ओबीसी बहुजन कल्याण मंत्री नामदार विजय वडेट्टीवार हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ओबीसी शिष्टमंडळाने त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ओबीसींच्या पदोन्नती मधील आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली
ओबीसी सोडून इतर सर्व मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळते, मात्र ओबीसींना ते मिळत नाही, हे समानतेच्या तत्त्वाला छेद देणारे आहे. महाराष्ट्र आरक्षण कायदा 2004 मधील कलम 5(1) अनुसार इतर मागासवर्गीया सोबत, ओबीसींना सुद्धा पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा कायदा झाला होता, नंतर मात्र ओबीसींना यातून डावलण्यात आले. तत्कालीन मंत्री स्वरुपसिंग नाईक यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑगस्ट 2005 रोजी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने सुद्धा ओबीसींना पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर 19 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती, तरीपण आत्तापर्यंतच्या सर्व सरकारांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ओबीसी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती मधील आरक्षणापासून वंचित ठेवले. आपण स्वतः ओबीसी योद्धा असून ओबीसी बहुजन कल्याण या खात्याचे मंत्री असल्यामुळे ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याची शिष्टमंडळाने ना. विजय वडेट्टीवार यांना मागणी केली असता, मंत्री महोदयांनी सांगितले की, मी यासंदर्भात आग्रही असून मंगळवार दिनांक 1 जून 2019 रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा लावून धरून इतर मागासवर्गीय प्रमाणे ओबीसींना सुद्धा पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याची मागणी करणार आहे.
निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, सचिव प्रा. देवानंद कामडी, संघटक सुरेश भांडेकर, अभियंता सुरेश लडके, एसटी विधाते, प्रभाकर कुबडे, प्रभाकरराव वासेकर पी.एस. घोटेकर, जितेंद्र मुनघाटे, सतीश विधाते, काशिनाथ गुरनुले, चंद्रकांत शिवणकर, कुणाल ताजने, अरविंद ठाकरे, एस.डी. खोकले, डि. एन. रोहनकर, एस एम वाघमारे, डी. ए. ठाकरे, महेंद्र ब्राह्मणवाडे,आदी उपस्थित होते.
प्रा. शेषराव येलेकर
उपाध्यक्ष
राष्ट्रीय ओबीसी महासंघ