ओबीसी बांधवांनो आणि महाराष्ट्रातील तरुणांनो सावधान…!! —————————————————————————–
काळ आणिबाणीचा आहे, मनुवादी महाराष्ट्रात दंगली पेटवू पहात आहेत…!!
मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष घडवून आणण्यासाठी काही नेत्यांना कामाला लावले आहे का.???
अशी दाट शंका आहे म्हणून, कुणाच्याही चिथावणी ला बळी पडू नका आणि महाराष्ट्रातील शातंता धोक्यात येईल असे वर्तन तुमच्या हातून घडू देऊ नका….!!
जे ओबीसी चे नेते म्हणून महाराष्ट्रात सभा घेत फिरत आहेत ते छगन भुजबळ खरेच ओबीसींचे नेते आहेत का.???
या प्रश्नावर ओबीसी तरुणांनी चिंतन केले पाहिजे, त्यांचा पुर्व इतिहास समजून घेतला पाहिजे…!!
कुठल्याही जात किंवा वर्ग समुहाचा नेता कुणाला म्हणावे.??
की, ते व्यक्तीमत्व त्या विशिष्ट समूहासाठी झटतं असेल त्यांना त्या समुहाचा नेता मानल्या जातेय…!!
ओबीसी बांधवांनो ओबीसी समाजाच्या हक्काचा जाहीरनामा ज्याला म्हटल्या जाते त्या मंडल आयोगाच्या लढाईच्या वेळेस छगन भुजबळ कुठे होते..??
त्यावेळी छगन भुजबळ शिवसेनेत होते आणि मंडल आयोगाचा विरोधी पक्ष भाजप सोबतं शिवसेनेची युती होती…!!
छगन भुजबळ मंडल सोबतं नाही तर कमंडल सोबतं होते, हा इतिहास आहे….!!
१९८७ साली महाराष्ट्रात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणातील रिडल्सचे प्रकरणाने पेट घेतला तेव्हा महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती…!! महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई मध्ये हिंदू विरुद्ध आंबेडकरवादी अशी दंगल होते की, काय अशी परिस्थिती असतांना भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी शांतता कायम रहावी म्हणून आपल्या सहका-यांना सोबतं घेऊन ७ फेब्रुवारी १९८८ या दिवशी मुंबई येथील हुतात्मा स्मारकाला सामुदायिक अभिवादन केले होते…!!
आंबेडकरी समुहाने हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले म्हणून हुतात्मा स्मारक बाटले, त्याचे शुद्धीकरण केले पाहिजे अशी आवई उठवून दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ फेब्रुवारी १९८८ या दिवशी शिवसेनेचे नेते छगन भुजबळ यांनी हुतात्मा स्मारकाचा गोमुत्राने अभिषेक करून हुतात्मा स्मारकाचे शुद्धिकरण केले होते, हा कट्टर मनुवादी इतिहास छगन भुजबळ यांच्या कारकिर्दीतील आहे…!!
हुतात्मा स्मारकाचे जलाभिषेक आणि गोमुत्राने शुद्धिकरण करणारे छगन भुजबळ फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे आहेत का.??? याचाही विचार आजच्या ओबीसी तरुणांनी केला पाहिजे…!!
ज्यांनी मंडल आयोगाची लढाई लढली नाही, आपलं तारुण्य धर्मांध राजकारणात घालवलं ते नाकर्ते नेते आरक्षणाच्या मुद्यांवर ओबीसी तरुणांची माथी भडकवतं असतील तर ओबीसी तरुणांनो सावधान…!!
अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना छगन भुजबळ यांच्या जातियवादी कृतीचा रिडल्स प्रकरणात स्वतः अनुभव असुनही कुठलाही पुर्वग्रह न बाळगता जेव्हा छगन भुजबळ महाराष्ट्र सदनाच्या भ्रष्टाचार प्रकरणात जेलमध्ये होते तेव्हा बाळासाहेब आंबेडकर छगन भुजबळ यांना जेलमध्ये भेटायला गेले आणि भेटून आल्या नंतर पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाचे आदेश असुनही न्यायाधीश जमानत का देतं नाही.?? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून छगन भुजबळ यांच्या जमानतीसाठी पार्श्वभूमी तयार केली होती…!!
वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे कुणाच्याही संदर्भात आकस मनात ठेऊन वागतं नाहीत तर महाराष्ट्रात दंगली घडू नये म्हणून दक्षता बाळगतं आहेत आणि शांतीदुताची भुमिका बजावतं आहेत हे समस्त महाराष्ट्रातील जनतेने लक्षात घ्यावे हीच अपेक्षा…!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.