ओबीसींच्या संवाद सभेचे मोठ्या उत्साहात स्वागत
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये चार ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत संवाद सभेचे आयोजित करण्यात आले असून सुरुवात गडचिरोली पासून करण्यात आली. 4 आक्टोंबर रोजी कमल केशव सभागृह कात्रटवार कॉम्प्लेक्स चामोर्शी रोड गडचिरोली येथे या संवाद सभेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी नियोजित सभेचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय प्रवक्ता वृषभ राऊत, नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजू चौधरी, ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली जिल्हाध्यक्ष दादाजी चूधरी, युवा जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर, महिला जिल्हाध्यक्ष मंगला कारेकर, युवती अध्यक्ष संतोषी सूत्रपवार, कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास मस्के आदी मंचावर उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थित आणि प्रमुख पाहुण्यांचे ओबीसी दुपट्ट्याने स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक वृषभ राऊत यांनी ओबीसी समाज निद्रिस्त असून त्याला जागे करणे हे आव्हानात्मक काम आहे एक वेळ कुंभकर्ण परवडला तो दर सहा महिन्यांनी जागा होत होता परंतु हा ओबीसी समाज मात्र एवढे अन्याय, अत्याचार होत असून सुद्धा जागा होत नाही परंतु या समाजाला जागे करण्याचे काम राष्ट्रीय ओबीसी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबन तायवाडे यांचे अध्यक्षतेखाली अविरत सुरू आहे. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या तसेच महा ज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित त्यांना दिली, राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघ 2016 मध्ये स्थापन झाला असून या महासंघाचे आतापर्यंत नऊ राष्ट्रीय अधिवेशने संपन्न झाली तसेच विविध आंदोलने छेडली त्यामुळे केंद्र व राज्य शासनाला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा द्यावा लागला, वैद्यकीय प्रवेश केंद्रीय कोठ्यामध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण, केंद्रीय व नवोदय विद्यालयांत प्रवेशामध्ये 27% टक्के आरक्षण, राज्यात 72 वस्तीगृहांना मान्यता, परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, प्राध्यापक संवर्ग कायदा महाज्योतीची निर्मिती इत्यादी निर्णय घ्यावे लागले. परंतु जोपर्यंत ओबीसींची जातनिहाय जनगणाना होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्तब्ध बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी 20 सप्टेंबर रोजी शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे स्वागत करत वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट रद्द केल्यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना फ्रीशिप चा फायदा होणार असल्याचे सांगितले तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ वस्तीगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार असून त्यासाठी वस्तीगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले तसेच एखादे कॉलेज शिष्यवृत्ती/ फ्रीशीप प्रलंबित कारणावरून विद्यार्थ्यांना त्यांचे कागदपत्रे देण्यापासून अडऊ शकत नाही असे करणाऱ्या कॉलेजवर दंडात्मक व मान्यता रद्द करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला तसेच मान्यवरांचे हस्ते सुनील चडगुलवार ,अरुण झाडे, रामचंद्र दशमुखे, सुधीर रोहनकर एड. संजय ठाकरे, प्रिया निशाने, घनश्याम जक्कुलवार , ज्योती भोयर, अलका गुरनुले यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी म्हणून नियुक्ती पत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोषी सूत्रपवार संचालन रामकृष्ण ताजने यांनी केले तर आभार सुरेश भांडेकर यांनी मानले कार्यक्रमाला गडचिरोली शहरातील तसेच चामोर्शी, धानोरा, वडसा, आरमोरी येथून बरेचसे ओबीसी बांधव उपस्थित झाले होते यात शरद ब्राह्मणवाडे, एस टी विधाते, गोविंदराव बानबले,पांडुरंग नागापुरे, दादाजी चापले, गंगाधर पाल, दिलीप गौरकर, पुरुषोत्तम घ्यार, महेश चिमूरकर, वर्षा चीमुरकर,नम्रता कुत्तरमारे, लोकमान बरडे व मित्रमंडळी, कवींद्र रोहनकर, दत्तात्रय खरवडे, प्रभाकर भागडकर, मधूकर विधाते, पुरुषोत्तम मस्के, हरिदास कोटरंगे, वामन भोयर, विजय गिरसावळे, वामन गुरनुले, भास्कर पिपरे, गंगाधर भोयर, पुरुषोत्तम ठाकरे, एम व्ही दिवटे, जे डी भोयर, पी आर माकोडे, चंद्रकांत मूनघाटे, अशोक शेळके, संतोष ठाकरे, सुरेंद्र मोरांडे, रामदास गव्हारे, मारुती दुधबावरे, सुलभा धामोडे, मीरा ताजने, अलका दोनाडकर, भारती पत्रे, चंदा गोंगल, शीला नखाते, वंदना चापले, कविता हिवरकर, रेखा वासेकर, निशा पिंपळे, नंदा चुटे, पुष्पा धंदरे, इंदिरा विधाते, सुरेश लडके, कृष्णा कोठारे, वैभव किरमे, महेंद्र लटारे, मनोज पिंपरे, शरद गद्देवार आदीसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.