एस.बी.एल. एनर्जी लिमिटेडमध्ये कामगारांच्या मुलभूत व पायाभूत सुविधांचा आभाव. आमदार चरणसिंग ठाकूर यांनी कंपनी व्यवस्थापनाला धरले धारेवर कंपनीला लागणार्या सोयी सुविधा उपलब्ध होई पर्यंत कंपनीला बंद ठेवण्याच्या सूचना

कोंढाळी-
26एप्रील रोजी दुपारी 11-30ते 12वाजताचे दरम्यान बाजारगाव जवळील मात्र
नागपूरपासून ४५ किमी अंतरावर काटोल तहसीलमध्ये येणाऱ्या येनविरा गावाजवळील कळमेश्वर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एस बी एल एनर्जी लिमिटेड कंपनी मधील क्रिपिंग ED युनिट मधिल प्लांट मधे डेटोनेटर बनवितांना स्फोट झाला. यात दोन महिला कामगार गंभीर जखमी झाल्या. या स्फोटात काटोल येथील संगिता लोखंडे तर मंडला निवासी वंदना जघीला या स्फोटात गंभीर जखमी झाल्या.
दोन्ही जखमी महिला कामगारांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे.
या घटनेच्या संबंधाने काटोल चे आमदार चरणसिंग ठाकूर 27एप्रील चे रात्री 09वाजताचे दरम्यान एस बी एल एनर्जी लिमिटेड कंपनीत पोहोचले.
खरे तर अत्यंत जोखमीचे व धोकादायक असलेल्या दारू गोळा उत्पादन करणाऱ्या कंपनीमधे पोहचण्यासाठी प्रमाणित मानकानूसार धडाचा रस्त्याही नसल्याचे आमदारांच्या लक्षात आल्यावर आमदार चरणसिंग ठाकूर यांनी एस बी एल एनर्जी लिमिटेड कंपनी चे व्यवस्थापकांना धारेवर धरले. तसेच उपस्थित राजस्व अधिकार्याना सुचना देण्यात आल्या की या भागातील उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांना बोलावून कंपनीला लागणार्या पायाभूत/मुलभूत तसेच अन्य आवश्यक सुविधांची पुर्तता होई पर्यंत कंपनी ला बंद ठेवण्याच्या सुचेना देण्यात आल्या आहेत.या प्रसंगी प्रा.देविदास कठाणे,किशोर गाढवे, सुनिल गमे सोबत होते
क्रिपिंग ई डी युनिट मधे कुशल कामगारांकडून डिटोनेटर बनविण्याचे काम करून घेतले जाते.मात्र
26एप्रील रोजी एस बी एल एनर्जी लिमिटेड कंपनी मधे झालेल्या घटने काम करणाऱ्या महिलांना डिटोनेटर सारखे अत्यंत जोखमीचे उत्पादन बनविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते की नाही या बाबतीत सखोल चौकशी करण्या संबधी आमदार चरणसिंग ठाकूर यांनी संबधीतीत अधिकार्यांना सुचना देण्यात आल्या आहेत.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
नागपूर जिल्ह्यातील एस.बी.एल. एनर्जी लिमिटेड येथे औद्योगिक स्फोटके आणि पूरक उपकरणे तयार केली जातात. येथे डिटोनेटिंग फ्यूज, पीईटीएन, तसेच डिटोनेटर आणि तत्सम स्फोटके तयार केली जातात. या जोखमीचे उत्पादन बनविण्यार्या कंपनीत कामगार सुरक्षा संबधी मोठ्या प्रमाणावर असलेल्या उनीवा याबाबत आमदार चरणसिंग ठाकूर यांनी कंपनी व्यवस्थापनाला खडसावले. या प्रसंगी प्रा. देवीदास कठाणे, किशोर गाढवे, सुनील गमे सह राऊळगावचे जनप्रतिनिधी सोबत होते.