एस पी कार्यालय भंडारा येथे बिजेपी कार्यकर्त्या सोबत असभ्य वर्तणूक. एस पी महोदय लोहित मतानी यांची चारदा अपॉइंटमेंट घेऊनसुद्धा ठेवले जाते बिजेपी कार्यकर्त्यांना तब्बल दोन तास तिष्ठत. प्रकरण वरठी पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे

प्रतिनिधी भंडारा
आज दिनांक ०६-१२-२०२३ रोजी भंडारा जिल्ह्यातील एस पी कार्यालय भंडारा येथे भारतीय जनता पक्षाचे सदस्य हे जनहितार्थ वरठी पोलीस स्टेशन चा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन आले असता त्यांना एस पी महोदय लोहित मतानी मीटिंग मध्ये उपस्थित असल्याचे सांगून वाट बघायला ठेवण्यात आले. त्यामुळे नेहमीप्रमाणे बीजेपी सदस्यांनी एस पी महोदय लोहित मतानी यांची लिखित स्वरूपात ॲपॉइंटमेंट घ्यावी लागली. अपोइंटमेंट घेतल्यानंतर नेहमी प्रमाणे एस पी महोदय लोहित मतानी यांनी तसेच त्यांच्या खाजगी सचिवांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्य यांना तिष्ठत बसवून ठेवले. बिजेपी सदस्य यांच्या नंतर कितीतरी लोक हे खाजगी मुद्दे घेऊन आले असता नेहमी प्रमाणे त्यांची भेट घ्यायला आत बोलावण्यात आले. नंतर नेहमी प्रमाणे एस पी महोदय लोहित मतानी जेवण करायला गेल्याचे सांगून बीजेपी सदस्य यांना भुलवण्यात आले.
प्रकरण असे की येत्या पाच वर्षांच्या कालावधी मध्ये वरठी पोलिसांनी स्वतःला आरटीओ असल्याचे सांगून पदांचा दुरुपयोग करून तब्बल २००० वाहने स्वतःच्या आवारात या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये जप्त करून ठेवली होती. या वाहनांचे मालक आपल्या वाहनांना आपल्या कुटुंबाचे सदस्य मानत असत. परंतु वरठी पोलीस हे वाहनांचे पुर्जे गायब करून वाहन वरठी पोलीस स्टेशन च्या आवारात वाहन ओलीस करून ठेवत असत. प्रस्तुत वाहने विकून वरठी पोलीसांचे लक्षावधी रुपयांची खंडणी गोळा करण्याचे कार्यक्रम नीत्याचे झाले होते. मोहाडी तहसीलदार यांना काहीही माहिती न होऊ देता रेती माफियांकडून जेसीबी ने रेतीचा उपसा केल्याची सोंगे सांगून त्यांची सुद्धा खंडणी वेगळी वसूल होत असे. वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण २६ गावे असून ही सव्वीस गावे मिळून ३०० अवैध मोहाफुल दारू व्यवसाय तसेच सट्टापट्टीचे १०० अवैध धंदे यांच्याकडून वरठी पोलीस स्टेशन चे ठाणेदार अभिजित पाटील यांच्या आशीर्वादाने तसेच बिट जमादार कोमल रोहाडकर यांच्या सहयोगाने नियमितपणे महिना बांधून ब्राऊन शुगर, गांजा व्यवसायाला प्रोत्साहन देत असल्याने प्रस्तुत भ्रष्टाचार हा कोट्यवधी रुपयांचा असल्याची माहिती आहे. तरीसुद्धा वरठी पोलीस स्टेशन हे अजूनही भाड्याच्या घरात आहे. एवढ्या पैशांनी तर वरठी पोलीस स्टेशन करीता मोठी शासकीय इमारत उभी करता येऊ शकते. परंतु वरठी पोलीस ते कधीच करणार नाहीत ते शासनाच्या तिजोरीवर नेहमीच डल्ला मारण्यास तत्पर असतात. प्रकरण असे की दाभा मोडीवरून कोथूर्णा मार्गावर सुर नदीच्या पात्रातून रेती माफिया हे रात्रंदिवस रेतीचा उपसा करीत आहेत. प्रस्तुत रेती घाट हे भंडारा पोलीस स्टेशन तसेच भंडारा तहसील कार्यालय अंतर्गत येत असूनही वरठी पोलीस स्टेशन चे ठाणेदार अभिजित पाटील तसेच बिट जमादार कोमल रोहाडकर हे मोहाडी तहसीलदार यांना कोणतीही सूचना न देता रेती तस्करांकडून लक्षावधी रुपयांची खंडणी नियमित पणे वसूल करीत आहेत. परंतु हा काळा पैसा वरठी पोलीस स्वतःच्या शासकीय इमारत प्रकल्पावर खर्च करीत नसून स्वतःच्या कुटुंबियांवर खर्च करीत आहेत.
जनतेचे प्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांना महिला सुरक्षा कायद्यांच्या कचाट्यात कसे अडकावे यावर वरठी पोलिसांचा विशेष भर असतो.
वरठी पोलीस भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत प्रवासी वाहने वसुली एजंट लिकेश वैरागडे याला जाऊन भेटले आणि तू सुद्धा आमच्यासाठी वसूलीची कामे कर आम्ही सुद्धा तुला कमिशन देऊ असे म्हणून आपली डील पक्की केली.
शासनाच्या तिजोरीची मोठ्या प्रमाणावर हेरा फेरी होत असून अवैध प्रवासी वाहनांकडून डूप्लिकेट पावत्या फाडून वरठी पोलीस स्वतःचे घर भरण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे यांनी शासनाचा पगार उचलण्याची गरज नसल्याचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.
एस पी लोहित मतानी यांना पत्रकारानी फोन केले असता एस पी लोहित मतानी यांनी संबंधित पत्रकारचे नंबर ब्लॉक करून ठेवले.