एस टी च्या संपा ची कोंडी फोडा! अन्यथा खाजगीकरणा ला तरी मंजूरी द्यावी

एस टी च्या संपा ची कोंडी फोडा! अन्यथा खाजगीकरणा ला तरी मंजूरी द्यावी
कोंढाळी-प्रतिनिधि
खरोखरच!महाराष्ट्रातील प्रवांशाना लाल परीची गरज आहे काय?
विलनिकरण या मागणी साठी एस टी चा कामगार संपावर गेले आहेत.या एस टी कर्मचारी संपाला (दुखवटा आंदोलन) मागील दोन महिन्या पेक्षा अधिक दिवस होत आहे. एस टी चे कामगार संपावर असुनही राज्यातील प्रवासी किंवा नागरिकांनी एस टी च्या संपाला पाहिजे तसे गांभिर्याने घेतल्याचे राज्यत तरी दिसून आले नाही. मागील दोन महिने लोटून गेल्यावरही प्रवाशांना आपल्या प्रवासासाठी लालपरीची गरज भासत आहे काय?हा ही प्रश्न सध्याच्या दोन महिने अधिकच्या आंदोलनावरून दिसुन येत आहे.
ग्रामिण शाळेकरी व ज्येष्ठ नागरिक यांची मात्र कोंडी होत असतांना ही ग्रामिण किंवा शहरी नागरीक एस टी चे कामगारांचे आंदोलना साठी अंदोलन करतांना अजून तरी रस्त्यावर उतरला नाही. राज्यातील विरोधी पक्षाचे दोन तिन आमदारांनी या आंदोलनाला हातभार लावला, मात्र काही दिवसांनी ते नेते ही सध्या एस टी कामगारां सोबत दिसुन येते नाहीत,. मान्यताप्राप्त कामगारांची संघटना किंवा अन्य स्वनामधन्य कामगार संघटनावर आता षकामगारांचा च विश्वास उरला नाही, अश्यात कामगारांचे संपाचे प्रकरण हातळनारे विधीतज्ञ कामगारांचे सांत्वन देण्यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेते तसेच राज्य मंत्री मंडळातील संबधीत विभागाचे नेत्यांवर दररोज माध्यमासमोर येऊन करत असलेले आगपखड ही कामगारांना दिलासा मिळत असल्याचे सध्या तरी दिलासा मिळतांना दिसत नाही. कामगारांना महामंडळा चे वतीतीने राज्याचे परिवहन मंत्री यांनी जाहीर केलेली पगार वाढ व अन्य सोयी पेक्षा विलनिकरणावर ठाम आहेत, हे कामगार आपल्या मागणी वर ठाम असले तरी आता प्रवाशांना एस टी ची खरोखरच किती गरज उरली आहे ,किंवा खाजगीकरण केल्यवर प्रवासी वाहतूक तर होईल मात्र राज्य सरकार च्या जनहिताचा 32प्रकारच्या सवलती सोडल्या तर प्रवासी आता एस टी वर किती विसंबून आहे हे चित्र मागील 65दिवसा पासून एक ही प्रवासी एस टी चे बाजूने रस्त्यावर आज तरी उतरला नाही.
गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करावा
मागील साठ वर्षा पासून अविरत जन सेवा देणारी लालपरी चे कामगारांचे प्रश्नावर राज्य सरकार कडून उचललेली पावले व कामगारांना मिळत असलेले विधीतज्ञांचे सल्ले यात एस टी च्या कामगारांचे सांत्वन एवजी अंत पाहणे सुरू असल्याचे चिन्ह दिसत आहे. या करीता एस टी कर्मचारी यांनी आपले कुटुंबीयां सह काढलेले मोर्चे त्याला प्रवाशांनी किती साथ दिली या वर सरकार चे कामकाजी धोरण सुरू आहे. संपामागे कामगार हितापेक्षा राजकारण अधिक झाल्याने व प्रवांशां पेक्षा विद्यार्थी ज्येष्ठ नागरीक यांची मात्र कोंडी झाली आहे. एस टी कामगारांचे आंदोलन प्रकरण उच्य न्यायालयात असल्याने कामगार ही विलनिकरण प्रकरण कामगारच जिंकणार या अपेक्षेने संगठण विरहीत कामगार न्यायालतात लढा देत असले तरी सरकार व कामगारांनी राज्यातील प्रवासी , विद्यार्थी यांचे सोई साठी *बहुजन सुखाय बहुजन हिताय* व *प्रवाशांचे सेवे साठी* व्रत घेतलेल्या एस टी महामंडळा चे कामगारांचा तिढा आता तरी सुटावा, कामगार व प्रवासी दोघांनाही राज्य सरकार ने न्याय मिळवून द्यावा ही प्रवाश्यांची अपेक्षा.
*मार्ग निघत नसल्यास एस टी चे खाजगीकरण करा*
सरकार ने एस टी कामगारांचे पगार वाढ केली ती पगारवाढ ही बहूदा मान्य नसावी म्हणून की विलनिकरण च फारच फायद्याचे या बाबद चे पेच प्रसंगी राज्यातील प्रवासी व विद्यार्थी यांची फरफराट थांबवयची असल्यास सरकार व कामगार संघटनाविरहीत एसटी कामगार यांनी या संपाची(दुखवटा आंदोलनाची)कोंडी फोडावी, अन्यथा एस टी चे खाजगीकरणा मंजूरी द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.