एस टी चेआंदोलक कामावर परतु लागले लाल परी धाऊ लागली
Summary
एस टी चेआंदोलक कामावर परतु लागले लाल परी धाऊ लागली काटोल आगाराचे 45टक्के कामगार कामावर शाळेच्या वेळेवर बस फेर्यांचे नियोजन करण्याची सलील देशमुख यांची मागणी कोंढाळीा/काटोल-वार्ताहर राज्यात कामावर परतणाऱ्या एसटी कर्माचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतेकजण न्यायालयाचे निकालानंतर वकिल […]
एस टी चेआंदोलक कामावर परतु लागले
लाल परी धाऊ लागली
काटोल आगाराचे 45टक्के कामगार कामावर
शाळेच्या वेळेवर बस फेर्यांचे नियोजन करण्याची सलील देशमुख यांची मागणी
कोंढाळीा/काटोल-वार्ताहर
राज्यात कामावर परतणाऱ्या एसटी कर्माचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतेकजण न्यायालयाचे निकालानंतर वकिल सदावर्तेंच्या अटकेनंतर रुजू होत आहेत. कर्मचारी पुन्हा कामावर रूजू होत असल्याने राज्यातील लाल परी (एसटी)पुन्हा धावणार असल्याची चिन्हं आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी मागील पाच महिन्यांपासून संप पुकारलाहोता. काटोल आगारात (एसटीमध्ये) सध्या (100)- चालक, (71 )वाहक, यांत्रिकी(56),तर(37)प्रशासकिय असे एकूण(264)कर्मचारी हजेरी पटावर होते. पैकी 16एप्रिल पर्यंत 26चालक, 20वाहक, 42यांत्रिक तर 27प्रशासकिय असे एकूण 115कामगार 44%टक्के कामगार रूजू झाले आहेत. त्यातील अनेकजण पुन्हा कामावर रुजू होत आहेत. त्यातील बाकीचे अनेक कामगार . वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कामावर रुजू होणार आहे. हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देशही राज्य सरकार, एसटी महामंडळाला देण्यात आले होते. मात्र, अटकेचा आणि कामावर रुजू होण्याचा संबंध नसल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.
एसटी ST कर्मचाऱ्यांची बाजू हायकोर्टात मांडणारे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा कामावर परतण्याचा ओघ वाढला असल्याचे दिसून येते. कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या १६ एप्रिलपर्यंत( ४४%)वर पोहचली आहे. येत्या काही दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती वैद्यकीय प्रमाणपत्रामुळे लांबली असल्याचे म्हटले जात आहे. सोमवार, मंगळवार पर्यंत कामावर परतणाऱ्यांची संख्या 200 होण्याचा अंदाज आहे. एस टी चे
कर्मचारी कामावर परतु लागल्याने बस फेर्यांमधे हळू हळू वाढ होतांना दिसत असली तरी *बहुजन हिताय-बहूजन सुखाय* व *गाव तिथे एस टी* हे ब्रिद वाक्य घेऊन चालनारे म रा मा प महामंडळ च्या बस सेवा ग्रामिण भागात सुरू करण्यासाठी स्थानिय प्रभारी आगार व्यवस्थापक ए डब्लू एस रामटेके व प्रशासकिय अधिकारी गजेंद्र फुलपेयर तसेच वाहतूक निरिक्षक, यांनी योग्य नियोजन करत असून उपस्थित कर्मचारी यांचे सहकार्यातून 55बस गाड्या पैकी 27बस गाड्या च्या सहायाने140फेर्या च्या मारून घेत 15एप्रिल चे एकूण प्रवासी भाडे उत्पन्न 1लाख 94हजार इतके होते अशी माहीती आगाराचे प्रभारी अधिकारी ए डब्लू एस रामटेके व प्रशासनिक गजेंद्र फुलपेयर यांनी दिले।
आता कामगार परतु लागल्याने काटोल आगारा अंतरगत येणारे नरखेड, जलालखेडा, कोंढाळी, व काटोल बस स्टेशन चे वाहनतळावर उभी राहणारी खाजगी वाहतूकीचे वाहने पार्किंग झोन चे ठराविक अंतररावर उभे करण्याचे आवाहन ही संबधित वाहतूक नियंत्रण कक्षाचे वाहतूक नियंत्रक व आगार व्यवस्थापकांनी संबधीत पोलीस स्टेशन व प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे अधिकारी यांनी खाजगी प्रवासी वाहतूक करनारे वाहन चालक मार्क यांना लेखी माहीती देऊन सुचीत करावे, तसेच
एस टी महामंडळाचे सुरक्षा अधिकारी(आय पी एस)यांनी संबधीत जिल्हा पोलीस अधिक्षक व महानगरिय क्षेत्रातील पोलीस आयुक्तांचे सहकार्य घेऊन खाजगी प्रवासी वाहतूकदांना समज द्यावी असे मत ग्रामिण भागातील प्रवासी संघटनानी केली आहे ,तर ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना सोईचे अश्या मानवविकास सेवा च्या बस फेर्या सुरू करण्या ची मागणी गावो गावचे पालक वर्गांने केली आहे.सध्या नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्याच्या बहुतेक सर्वच शाळा एप्रील च्या शेवटच्या आठवड्या पर्यंत सुरू आहेत तरी शाळांचे वेळेवर बस सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्याची मागणी नागपुर जि प चे मेटपांजरा सर्कल सदस्य सलील देशमुख यांनी केली आहे।
आंदोलन दरम्यान अटकेतील एस टी कामगारांबाबद विचारल्यावर या अधिकारी वर्गाने बोलने टाळले।