एसटी महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलगीकरण करण्यात यावे :- राजु झोडे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला
Summary
संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. चंद्रपूर.. . ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य महामंडळ परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या मूलभूत मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. राजुरा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला आहे. सदर संपाला वंचित बहुजन आघाडीचे नेते […]

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
चंद्रपूर.. . ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य महामंडळ परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या मूलभूत मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. राजुरा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला आहे. सदर संपाला वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण मागण्या रास्त आहेत व सर्व मागण्या त्वरित मान्य झाल्या पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीने संपाला जाहीर पाठिंबा दिला.
एसटीतील तुटपुंजा वेतनामुळे व वेतनाच्या अनियमितपणामुळे कर्मचाऱ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होतात. एसटी महामंडळातील कर्मचारी दिवस-रात्र काम करून त्यांना थोड्याच वेतनात समाधान मानावे लागते. राज्य सरकारने यावर विचार करावा व एसटी महामंडळ राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करावे या मागणीला घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात दीपावलीच्या शुभमुहूर्तावर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून सरकारने यावर तात्काळ विचार करावा व एसटीतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे असे स्पष्ट मत राजू झोडे यांनी संपातील कर्मचाऱ्यांसमोर मांडले. राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे एसटी महामंडळातील कित्येक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेले आहेत.सरकार पुन्हा एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करायची वाट बघत आहे काय? असा सवाल राजू झोडे यांनी राज्य सरकारला केला. राज्य सरकारने यावर तात्काळ विचार करून संपातील सर्व मागण्या मान्य कराव्या व एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी संपातील कर्मचाऱ्यांसोबत राजू झोडे यांनी केली.