BREAKING NEWS:
हेडलाइन

एसटी! कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान!!

Summary

एसटी! कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान!! शासन प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान कोंढाळी -वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळपास दिड-दोन वर्ष शाळा कुलुपबंद होत्या. दिवाळीपूर्वी शाळा, महाविद्यालय सुरू झाले होते. त्यात पुन्हा दिवाळी […]

एसटी! कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान!!

शासन प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान

कोंढाळी -वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळपास दिड-दोन वर्ष शाळा कुलुपबंद होत्या. दिवाळीपूर्वी शाळा, महाविद्यालय सुरू झाले होते. त्यात पुन्हा दिवाळी सुट्यामुळे खंड पडला होता. आता शाळा, महाविद्यालय सुरु झाले आहे. मात्र ग्रामीण भागातुन शहरात अथवा नजीकच्या शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी एसटीचा पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेअंतर्गत जवळपास दीड हजार विद्यार्थीनी लाभार्थी आहेत. मात्र बस बंद असल्याने मुलींचा हिरमोड झाला आहे. काही मोजक्या मुली खासगी वाहनाचा जीवघेणा प्रवास करून शिक्षणासाठी येताहेत. कोरोना संसर्गाच्या भितीने राज्य सरकार सावध पवित्रा घेत शाळा, महाविद्यालय टप्प्याटप्याने सुरू केले. शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग, तर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आता तर प्राथमिक शाळा ही सुरू झाल्या आहेत. गावापासून शाळेचे अंतर अधिक असल्यामुळे अनेक मुलांनी बसचा पास काढून शाळेत ये-जा करतात. पण संपामुळे बसचा पर्याय उपलब्ध होत नसल्याने अडचण येत आहे. विशेषतः मुलींची अडचण होत आहे. पालकांना देखील मुलींना शाळेत कसे पाठवावे असा प्रश्न सतावत आहे. दरम्यान प्रदीर्घ काळात ऑनलाईन शिक्षण सुरू होते, मात्र विद्यार्थीनींना ऑफलाईन शिक्षणाची उत्सुकता लागली होती. मोजकेच दिवस शाळा, महाविद्यालयात जाण्याचा योग आला आहे . पण त्यात योगायोगाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आणि बसचा पर्याय बंद झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

*सात हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न !*काटोल आगाराअंतरगत कोंढाळी-काटोल-सावरगाव-

नरखेड-जलालखेडा या बसस्थानकातुन ज्या-ज्या भागातील विद्यार्थी व विद्यार्थीनींना प्रवासासाठी बसपासच्या पर्याय उपयूक्त ठरतो. एसटी महामंडळाने मुलींसाठी अहिल्यादेवी होळकर मोफत बसपास योजना सुरू केली. या योजनेत काटोल नरखेड तालुक्यातील जवळपास दोन हजार मुली लाभार्थी आहेत. यात बावीस शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थीनींचा समावेश आहे. तर कमी दरात रक्कम भरून पास काढलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अडीच हजार आहे. दरम्यान बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसचा पर्याय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना महागड्या खासगी प्रवास भाडे द्यावे लागते. त्यासाठीही प्रतिक्षा करावी लागते. प्रतिक्षेलाही मर्यादा असाव्यात !गेल्या१२८ दिवसांपासुन विविध न्याय मागण्यासाठी सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजुनही सुरूच आहे. कर्मचारी- कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, राज्यकर्ते व प्रशासनात तोडगा निघत नाही, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. आज गरिबांची लालपरी बंद असल्यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी यांचे हाल होत आहेत. बस सुरू होण्याची किती प्रतिक्षा करावी, यालाही काही मर्यादा आहेत. राज्य सरकारने पर्याय म्हणुन खासगी वाहनांना मुभा दिलेली असली तरी त्यांच्याकडुन आकारले जाणारे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे नाही.

सध्या एस टी कर्मचारी संपावर असून हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे.या प्रकरणाची सुनावनी निकाल 11मार्च रोजी ठेवण्यात आली आहे, विद्यार्थ्यांनी बस सेवा सुरू करण्यात यावी अशी आर्त हाक करण्यात येत आहे.

: काटोल आगारातील 80कामगारांवर कार्यवाही

काटोल आगारातील 80कामगारांवर कार्यवाही चा बडगा

61कामगार बडतर्फ!

फक्त 17कामगार कामावर!

मिळालेल्या माहितीनुसार

काटोल आगारातील 309 एस टी कर्मचार्यां पैकी 61कामगार बडतर्फ करण्यात आले तर 80कर्मचार्यांना नियमीत . दोषारोपण पत्र देण्यात आले आहे तर 05निलंबित करण्यात आले आहेत ,सध्या17कर्मचारी कामागीर वर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *