नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

एसटीच्या सवलती वाढवल्या, त्याप्रमाणे प्रवासी बस गाड्या वाढविण्ची मागणी सवलती वाढल्या एस टी च्या प्रवासी बसेस वाढवा अशी मागणी जि प सदस्य सलील देशमुख यांनी राज्याचे परिवहन सचीव पराग जैन यांचे कडे केली आहे.

Summary

कोंढाळी-: प्रतिनिधी एसटीने प्रवास करण्यासाठी विविध घटकांना आधीपासूनच सवलती देण्यात आलेल्या आहेत. आता महिलांना प्रवास भाड्यात सवलत दिल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही गर्दी पेलण्याची क्षमता सध्याच्या व्यवस्थेत नसल्याने नियमित प्रवासी आणि सवलतीचे प्रवासी यांनाही त्रास आणि विविध […]

कोंढाळी-: प्रतिनिधी
एसटीने प्रवास करण्यासाठी विविध घटकांना आधीपासूनच सवलती देण्यात आलेल्या आहेत. आता महिलांना प्रवास भाड्यात सवलत दिल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही गर्दी पेलण्याची क्षमता सध्याच्या व्यवस्थेत नसल्याने नियमित प्रवासी आणि सवलतीचे प्रवासी यांनाही त्रास आणि विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सवलती वाढल्या तशी यंत्रणाही वाढवावी, तसेच काटोल आगाराकरिता या आधी ६८बसे उपलब्ध होत्या सध्या ४५बसेस उपलब्ध असून यात चार‌ पाच प्रवासी बसेस मधे मार्गस्थ किंवा आगारा बिघाडतात यामुळे आधिच आवश्यक पैकी २५प्रवासी बसेसची संख्या कमी त्यात ही मार्गस्थ बिघाड झालेल्या बसेस यांचा फटका शाळेकरी पास धारक विद्यार्थ्यिंना/व विद्यार्थ्यांना बसत असतो. तसेच एस टी महामंडळ प्रशासन व प्रवाशांमधे वाद निर्माण होतात. अशी माहिती जि प सदस्य सलील देशमुख यांनी दिली तसेच राज्याचे परिवहन सचिव पराग जैन यांना भेटून मागणी पत्र लिहून काटोल आगारासाठी २५प्रवासी बसगाड्यांची मागणी केली आहे.
जि प सदस्य सलील देशमुख यांनी सांगितले राज्यसरकारने महिलांसाठी अर्धे तिकीट दराने प्रवास सुरू केला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना ६५ वर्षानंतर अर्धे तिकीट व ७५ नंतर मोफत प्रवास विद्यार्थ्यांना ६७.३३% सवलत १२व्या वर्गापर्यंत अहिल्याबाई होळकर व मानवविकास या योजनेचे माध्यमातून मोफत प्रवास अशा सुविधा दिल्या आहेत. पण ज्या गाडीत इतके वृध्द नागरिक व महिला आता मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. विद्यालयीन – महाविद्यालयात शिक्षण घेणारी पासधारक विद्यार्थ्यांनी/ विद्यार्थी /मुलांची व इतर पुरुषांची संख्या खूप मोठी आहे. अगोदरच बसेसची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे गर्दी खूप असते. बस आली की शाळेकरी विद्यार्थी ,तरुण मुले बॅग खिडकीतून आत टाकतात. त्यामुळे बसमधील जागेकरिता बस मागे घेतांना धोके पत्करले जातात. काही प्रवासी चालकाचे दार उघडुन आत घुसतात. यात बरेचदा वाद निर्माण होतात.तसेच बस मधे चढतांना या ढकला ढकलीत वृद्ध व महिलांना जागा मिळत नाही व आत घुसताना होणाऱ्या गर्दीत अनेकजण जखमी होतात.
याकरिता काटोल आगारा करिता प्रवासी वाहतूकतसेवे दरम्यान विद्यार्थी संख्या व त्यांचे सवलती पासेस तसेच शेतकरी, शेतमजूर, महिला ,पुरूष, ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या प्रमाणात बसेसची संख्या तातडीने वाढवण्याची गरज असून त्यासाठी काटोल आगारासाठी आवश्यकतेनुसार २५प्रवासी बस गाड्यांची मागणी जि प सदस्य सलील देशमुख यांनी राज्य परिवहन सचीव यांचे कडे केली आहे.
त्याच प्रमाणे सध्या स्थितीत काटोल आगार ४०लाखाचे फायद्यात असलेल्याने काटोल आगारातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ही आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *