एम.सी.ई.डी. भंडारा कार्यालयाचा विवादास्पद कारभार. स्वर्गीय पार्वताबाई मदनकर कॉलेज चे पैसे खाल्ले
प्रतिनिधी भंडारा
सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भंडारा या संस्था कार्यालयाच्या मोहक जाहिरातींना कुणीही बळी पडत असतो. अशीच एक जाहिरात एम.सी.ई.डी तर्फे सबस्क्राईब करा उद्योजक मासिक. प्रस्तुत उद्योजक मासिक पत्रिका वार्षिक शुल्क जवळपास ९०० रुपये स्वर्गीय पार्वताबाई मदनकर कॉलेज वरठी चे मुख्याध्यापक श्री. आशिष बोरकर यांनी यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी सबस्क्राईब केले होते. प्रस्तुत जाहिरात ही भंडारा एम.सी.ई.डी. येथून प्रिन्सिपॉल साहेबांच्या व्हॉट्सॲप वर आली होती.
परंतु गेली सहा महिने वाट बघून सुद्धा प्रस्तुत उद्योजक मासिक पत्रिका पार्वताबाई मदनकर कॉलेज येथे पोहोचलीच नाही. परंतु महाराष्ट्र उद्योजगता विकास केंद्र भंडारा चे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौरे यांच्या व्हॉट्सॲप वर मासिकपत्रिका सबस्क्रिप्शनची पावती जरूर पोहोचली तरीसुद्धा प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौरे यांनी मासिकपत्रिका स्वर्गीय पार्वताबाई मदनकर कॉलेजच्या ऍड्रेसवर का पोहोचत नाही याची दखल घेतली नाही व नेहमीप्रमाणे भ्रष्टाचार करून पैसे खाल्ले.
प्रस्तुत घटनेची तक्रार स्वर्गीय पार्वताबाई मदनकर कॉलेज वरठी चे प्रिन्सिपॉल यांनी पोलीस योद्धा न्युज नेटवर्क ला केली आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भंडारा येथे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार असून प्रस्तुत स्वायत्त संस्था शासकीय संस्थांकडून मिळालेल्या पैशांचे नियोजन करण्यासाठी प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु शासकीय संस्थांकडून मिळालेला पैसा प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौरे भ्रष्टाचार करण्यात घालवीत असल्याच्या तक्रारी स्वतः येथील नियुक्त कंत्राटी कार्यक्रम समन्वयक महिला तसेच पुरुष करीत आहेत.
स्टायफंड चा पैसा सुद्धा उमेदवार यांना बरोबर मिळत नसल्याच्या तक्रारी ह्या येतच असतात.
प्रस्तुत स्वायत्त संस्थेवर शासकीय संस्था का म्हणून एवढा विश्वास ठेवते याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून विचारण्याची गरज आहे.