एम. सी. ई. डी उप केंद्र हिंगणा , नागपूर येथील केंद्र प्रमुख तथा जिल्हा प्रकल्प अधिकारी हेमंत वाघमारे सर यांच्या कार्याची दखल घेऊन यांना समता सैनिक दल दीक्षा भूमी नागपूर द्वारा समता योद्धा पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी दीक्षाभूमी
आज दिनांक १४ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र संस्था नागपूर चे जिल्हा प्रकल्प अधिकारी मा. श्री. हेमंत वाघमारे सर यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती प्रीत्यर्थ नागपूर येथील दीक्षाभूमी आणि दीक्षाभूमी ओडिटोरियम हॉल येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये ‘समता योद्धा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. प्रस्तुत पुरस्कार सन्मान कार्यक्रम हे समता सैनिक दल, दीक्षाभूमी नागपूर मार्फत घेण्यात आले होते.