एम.जी.नगर कन्हानचे मित्रांसह पोहायला गेले ल्या दोघाचा कन्हान नदीपात्रात बुडून मुत्यु. कन्हान नदी पात्रात पोहण्याचा मोह दोन मुलाच्या जिवावर बेतला.
*नागपूर* कन्हान : – नगरपरिषद प्रभाग क्र १ एम.जी. नगर कन्हान येथे राहणारे चार मित्रांसह कन्हाननदी सत्रापुर शिवारातील नदीपात्रात पोहताना चार मित्रा पैकी हासिम पुरवले व रोहन भिसे या दोन मित्राचा नदी पात्रातील खोल पाण्यात बुडाल्याने मुत्यु झाला. पोलीसांनी जिवन रक्षक दलाच्या मदतीने मुत्युदेह बाहेर काढुन उत्तरीय तपासणी करिता कामठी उपजिल्हा रूग्णाल यात पाठविण्यात आले.
शुक्रवार (दि.७) मे ला दुपारी ३ वाजता दरम्यान सुमारास प्रभाग क्र १ एम.जी. नगर कन्हान येथे राहणारे चार मित्र कन्हान नदीच्या सत्रापुर शिवार नदी पात्रातील पाण्यात पोहत दोन तास मौजमस्ती करित असताना खोल पाण्याचा डोहाचा अंदाज न आल्याने १) हासिम नंदकिशोर पुरवले वय १६ वर्ष व २) रोहन रणजीत पिसे वय १६ वर्ष दोन्ही राहणार प्रभाग क्र १ एम.जी. नगर कन्हान हे पाण्यात बुडाले असता सोबत च्या मित्रांनी त्याचा शोध घेतला ते मिळुन न आल्याने त्यांनी घाबरून परिसरातील नागारीकाना व तेजस संस्थेचे उपाध्यक्ष देविदास पठारे यांना सांगितल्याने सत्रापुर व एम जी नगरातील नागरिक, परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचुन त्याच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते मिळुन न आल्याने पोलीसांना सुचना देताच कन्हान पोलीस स्टेशनचे परी.पो.उप अधिक्षक, कन्हान थानेदार सुजीतकुमार क्षीरसागर, पो उप निरीक्षक जावेद शेख, हेडकास्टेबल जोसफ, पो शि मुकेश वाघाडे, शरद गीते, संजय बदोरिया, कुणाल पारधी, विरेन्द्र चौधरी सह घटनास्थळी दाखल होऊन जिवन रक्षक दलाला बोलावुन त्यांचा शोध करित सायंकाळी पाच वाजता दोघाचे मृतदेह बाहेर काढुन पंचनामा करून शासाकिय कामठी उपजिल्हा रूग्णा लयात उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आले. पुढील तपास कन्हान थानेदार सुजितकुमार श्रीरसागर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरिक्षक जावेद शेख सह पोलीस कर्मचारी करित आहे
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535