एमपीएससी स्पर्धा परीक्षेत प्राविन्य मिळवून ब्रम्हपुरीच्या शिरपेचात किंजल प्रकाश जनबंधू चा मानाचा तुरा!
Summary
प्रेसनोट एमपीएससी स्पर्धा परीक्षेत प्राविन्य मिळवून ब्रम्हपुरीच्या शिरपेचात किंजल प्रकाश जनबंधू चा मानाचा तुरा! चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या शैक्षणिक नगरीत वास्तवास असलेल्या किंजल प्रकाश जनबंधू यांनी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा -२०१९ च्या स्पर्धा […]
प्रेसनोट
एमपीएससी स्पर्धा परीक्षेत प्राविन्य मिळवून ब्रम्हपुरीच्या शिरपेचात किंजल प्रकाश जनबंधू चा मानाचा तुरा! चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या शैक्षणिक नगरीत वास्तवास असलेल्या किंजल प्रकाश जनबंधू यांनी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा -२०१९ च्या स्पर्धा परीक्षेमध्ये जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी-२ हे पद मिळवण्यात यशस्वी होऊन ब्रम्हपुरी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. किंजलचे वडील लोकमान्य टिळक विद्यालयात शिक्षक तर आई ही जिल्हा परीषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. किंजलची लहान बहीण पुणे येथे आय टी क्षेत्रात सॉफ्टवेअर इंजिनिअर असून धाकटी बहीण ही एम एस सी (गणित) मध्ये शिक्षण घेत आहे. किंजल ने स्पर्धा परीक्षेचे कोणतेही शिकवणी वर्ग न लावता तिने अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज संगमनेर येथील प्राध्यापक व उत्तीर्ण झालेले अधिकारी यांच्या मार्गर्शनाखाली घरीच अभ्यास करून स्पर्था परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे किंजल ने सन 2020 एमपीएससी ची मुख्य परीक्षा सुद्धा पास केली आहे. तिच्या या यशाबद्दल प्रहार शिक्षक संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर चे अध्यक्ष जयदास सांगोडे, मुन्ना येरणे, संजय सोनकुसरे, देवानंद तूडकाने, हिरालाल बंसोडे, छाया जांभुळे, छाया संगोडकर, संजय काकडे , संजय सोनकुसरे,श्रीकांत खोब्रागडे यांनी किंजल चे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.