एनपीएस योजनेची सक्ती थांबवा! -प्रहार शिक्षक संघटना
प्रहार शिक्षक संघटना एनपीएस योजनेची संपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांना दिल्याशिवाय सक्ती करण्यात येऊ नये असे असताना चंद्रपूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी 16 सप्टेंबर2020 रोजी परिपत्रक निर्गमित करून मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांनी एन पी एस योजना धारक कर्मचाऱ्यांचे सी एफ आर एफ फार्म भरून घेण्याची सक्ती केल्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेने चंद्रपूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 19 सप्टेंबर2020 ला निवेदन पाठवून एनपीएस योजनेची शक्तीचा विरोध केला असून त्या निवेदनाची प्रत राज्याचे शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांना पाठविण्यात आलेली असून एनपीएस योजनेची सक्ती केल्या स प्रहार शिक्षक संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे यांनी आंदोलन करण्याचे निवेदनात म्हटले आहे. 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तदनंतर जिल्हा परिषदा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय 3 ऑक्टोंबर2005 ,,7 जुलै2007 ,21 नोव्हेंबर 2010 व 5 जुलै 2013 अन्वये परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना डीसीपीएस लागू करण्यात आलेली होती. शासनाने डीसीपीएस योजनेतील खात्यावर शासनाकडून दिले जाणारे अंशदान व व्याज दिले नाही. शासनाने लागू केलेली डीसीपीएस योजना फसलेली असताना एनपीएस ही योजना सुरू करण्यापूर्वी त्या योजनेची संपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांना देऊनच एनपीएस खाते उघडणे संयुक्त होईल अशी कर्मचाऱ्यांची भावना असून याबाबतीत राज्यातील शिक्षक संघटनांनी शासनाला यापूर्वीच निवेदन सादर केले असताना चंद्रपूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फतीने एनपीएस खाते उघडण्यासाठी पत्र निर्गमित करुन शक्ती केल्यामुळे प्रहार शिक्षक संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर यांनी तीव्र विरोध केला असून जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व गटाशिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन एनपीएस खाते थांबवण्याची प्रहार शिक्षक संघटना तालुका शाखेने केलेली असून संघटनेचे तालुका अध्यक्ष देवेंद्र रायपुरे, नागेश सुखदेवे, अमोल खोब्रागडे, महेंद्र मेश्राम, मिलिंद खोब्रागडे, धर्मेंद्र मेश्राम, आशिष रामटेके, मुन्ना येरणे, संजय काकडे, प्रदीप टिपले, सिद्धार्थ रंगारी, विलास बनसोड, अरविंद भंडारे, प्रदीप मांडवकर, संजय मरापे, हंसराज शेंडे, सुभाष चांदेकर यांनी निवेदन दिलेले आहेत असे संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष नागेश सुखदेवे यांनी संघटनेच्या पत्रकाद्वारे दिलेले आहे. प्रति, मान. जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, संपादक दैनिक, साप्ताहिक ,,,, ,,,,,, ,,,,, सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून, साप्ताहिकातून प्रकाशित करावी. ही विनंती. आपला स्नेहांकित, नागेश सुखदेवे, जिल्हा कोषाध्यक्ष , प्रहार शिक्षक संघटना जिल्हा शाखा ,चंद्रपूर