एनएमएमएस परीक्षेत सरस्वती विद्यालयाने गाठले यशाचे शिखर
Summary
अर्जुनी मोर.:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे २२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा निकाल ७ फेब्रुवारीला जाहीर झाला. यात सरस्वती विद्यालयातील एकूण २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नुकताच जाहीर झालेल्या एन.एम.एम.एस.परीक्षेच्या पात्रता यादीमध्ये […]

अर्जुनी मोर.:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे २२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा निकाल ७ फेब्रुवारीला जाहीर झाला. यात सरस्वती विद्यालयातील एकूण २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नुकताच जाहीर झालेल्या एन.एम.एम.एस.परीक्षेच्या पात्रता यादीमध्ये २२ विद्यार्थ्यांपैकी विद्यालयातील १३ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरलेत.
सरस्वती विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा एनएमएमएस परीक्षेतही कायम राखली आहे. या पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी १५ हजार रुपये याप्रमाणे बारावीपर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. यात खुल्या प्रवर्गातून कु. जान्हवी खेमराज खोटेले, इशांत राजेंद्र संग्रामे, मृणाल चक्रवर्ती बडोले, प्रेमानंद हरिलाल मेहंदळे, वेदांत प्रशांत सोनवणे, विनीत माधोराव लांजे, विवेक किशोरकुमार मस्के, यथार्थ अमितकुमार सरजारे.
अनुसूचित जातीतून युगांत तुजेश्वर शहारे, तर इतर मागास वर्गातून कु. चेतना रुपचंद लांजेवार, कु. उन्नती दिगंबर कुंभलवार, मोहित धनंजय हुकरे, उमंग लुकाराम चुटे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.
यशस्वी विद्यार्थ्यांना सुरेश कुंभारे, शिवचरण राघोर्ते, अमर वसाके व सर्व विषय शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष डॉ. बल्लभदासजी भुतडा, संस्था सचिव सर्वेश भुतडा, कोषाध्यक्ष जयप्रकाश भैया, प्राचार्य जे. डी. पठाण, उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन कौतुक केले.