एक हात मदतीचा….
Summary
Sunday For Society Spandan Foundation एक हात मदतीचा…. प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट गडचिरोलीचे समन्वयक तथा लाॅयन्स क्लब गडचिरोलीचे सदस्य डॉ. सुरेश लडके नियमितपणे मातोश्री वृद्धाश्रम गडचिरोली ला भेट देत असतात.वृध्दाश्रमातील वृध्दांची आरोग्य तपासणी करण्यासाठी हाक दिल्यानंतर गडचिरोलीतील वैद्यकीय सेवा देणारे […]

Sunday For Society Spandan Foundation एक हात मदतीचा….
प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट गडचिरोलीचे समन्वयक तथा लाॅयन्स क्लब गडचिरोलीचे सदस्य डॉ. सुरेश लडके नियमितपणे मातोश्री वृद्धाश्रम गडचिरोली ला भेट देत असतात.वृध्दाश्रमातील वृध्दांची आरोग्य तपासणी करण्यासाठी हाक दिल्यानंतर गडचिरोलीतील वैद्यकीय सेवा देणारे मार्कंडेय हॉस्पिटल गडचिरोलीचे संचालक डॉ प्रशांत चलाख, स्पंदन हॉस्पिटलचे संचालक डॉ मिलिंद नरोटे, समर्थ डेंटल क्लिनिकचे डॉ उमेष समर्थ वृध्दाच्या तपासणीसाठी रविवारी वृद्धाश्रमात दाखल झाले. यावेळी प्रामुख्याने सर्व निवासी आजी-आजोबांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधपचार करण्यात आले.
वृद्धाश्रमात विजेची सोय नाही त्यामूळे रात्री अंधार झाल्यावर वृध्दांची गैरसोय होते.यावर तात्पूरता उपाय म्हणून डॉ सुरेश लडके यांनी चार सौरऊर्जेवर चालणारे दिवे भेट दिलेत. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा म्हणून वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ प्रशांत चलाख, डॉ मिलिंद नरोटे, डॉ उमेश समर्थ, सिटी पॅथॉलॉजीचे डॉ पंकज साकीनालवार, कोवे डेंटलचे डॉ चेतन कोवे,बोदेले डेंटलचे डॉ धम्मदीप बोदेले, साई होमिओपॅथीचे डॉ किशोर वैद्य, वेदा पाइल्सचे डॉ सौरभ नागुलवार यांनी कायमस्वरूपी विद्युत समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे व लवकरच विद्युत समस्येचे निराकरण होईल. तसेच आरोग्य तपासणी सुध्दा नियमितपणे करण्याचे डाॅक्टररांनी सूतोवाच केलेले आहे. त्याचप्रमाणे मार्कंडेय व स्पंदन हॉस्पिटलमध्ये वृद्धाश्रमातील सर्वांवर मोफत उपचार यापुढे केले जातील. तसेच लाॅयन्स क्लब गडचिरोली व सबाॅर्डीनेट असोसिएशन यांनी सुध्दा सहभाग नोंदविण्याचे ठरविले आहे.
अनेक सोप्या समस्या सहज सोडविता येतात यासाठी सर्वांनी एकत्र येत वेळ देण्याची गरज आहे.आपण सर्वांनी सहकार्य केल्यास अनेक छोट्या समस्या आपण एकत्रित सोडवू शकू. हा रविवार सत्कारणी लागला यापेक्षा वेगळा आनंद तो काय? आरोग्य व शिक्षण या प्रमुख समस्येवर प्रामुख्याने काम करणे गरजेचे आहे. आपण एकत्रित येऊया, आठवड्यातील एक दिवस देऊया.सुदृढ समाज घडवूया.स्पंदन फौंडेशनच्या संडे फॉर सोसायटीच्या उपक्रमात सहभागी होऊया.
शेषराव येलेकर
विदर्भ न्यूज नेटवर्क