एक किलो सोने 28 लाखांचे लोभापोटी 18 लाख रुपये बनावट पोलिसांचा सहभाग पोलीस अधिक्षकांची घटनास्थळ निरिक्षण आरोपींचे शोधात पथके रवाना
Summary
कोंढाळी-वार्ताहर- दुर्गाप्रसाद पांडे कोंढाळी- नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 (06) कोंढाळीजवळील अंकलेश्वर ढाबा येथे 09डिसेंबर चे दुपारी 1:00 ते 1:30 वा.चे दरम्यान गजानन सुखदेव ब्राह्मणे (43, )रा. वरुड, जि. अमरावती). यांना स्वस्त दरात देण्याबाबत आरोपीतांकडू चर्चा झाली. चर्चेनंतर गजाननने […]
कोंढाळी-वार्ताहर-
दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी-
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 (06) कोंढाळीजवळील अंकलेश्वर ढाबा येथे 09डिसेंबर चे दुपारी 1:00 ते 1:30 वा.चे दरम्यान गजानन सुखदेव ब्राह्मणे (43, )रा. वरुड, जि. अमरावती). यांना
स्वस्त दरात देण्याबाबत आरोपीतांकडू चर्चा झाली. चर्चेनंतर गजाननने 18 लाख रुपये रोख दिले आणि उर्वरित 10 लाख रुपयांसाठी गजानन सोने विकनारे आरोपीसह त्याच्या गावी वरूडला जात होता. दरम्यान, आरोपींनी गजाननला मारहाण करून वाहनातून ढकलून दिले आणि 18 लाख रुपये घेऊन पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, गजानन सुखदेव ब्राह्मणे हे वरुड येथील रहिवासी आहेत. त्यांचा मासेमारीचा व्यवसाय आहे. महिनाभरापूर्वी गजानन आणि आरोपींनी एक किलो सोन्यासाठी २८ लाख रुपये देण्याचा सौदा झाला होता.मात्र या दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या काळात कडेकोट बंदोबस्त असल्याने आरोपींनी फिर्यादी गजानन यांच्याशी सोन्याच्या देवाणघेवाणीबाबत नंतर सौदा करू असे सांगितले होते. विधानसभा निवडणुक संपन्न झाल्यानंतर करारानुसार आरोपी व गजानन ब्राह्मणे यांच्यात सोने देवान घेवाण करण्यासाठी सौदा ठरला. त्या नुसार 9 डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील अंकलेश्वर ढाब्यावर एक किलो सोने खरेदी गजानन ब्राह्मणे अंकलेश्वर ढाबा येथे सोने विकनार्यांचे प्रतिक्षेत बसला होता. अंदाजे एक दिड तासानंतर सोने विकनारी टोळी अंकलेश्वर ढाब्यावर पोहोचली. गजानन व सोनं विकायला आलेल्या सोबत गजानन चा 28 लाखात एक किलो सोन्याचा सौदा झाला. गजाननने या व्यवहारासाठी आरोपींना 18 लाख रुपये रोख दिले . तसेच आरोपींनी गजाननला सोने असल्याचे दाखवले.18लाखरोख रक्कम दिल्यावर उर्वरित आरोपींना 10 लाख रुपये देण्यासाठी गजानन आणि आरोपी एमएच 43 एआर 73 99 या क्रमांकाच्या कारने वरुडकडे जात होते, दरम्यान कारंजा टोलनाक्याजवळ आरोपींनी कार मागे वळवून काटोलच्या दिशेने पळ काढला दरम्यान, काटोल गजकेसरी हॉटेलजवळ पोहोचले, या घटनेत दोन वाहनांतील आठ जण पोलिसांच्या वेशात तोतया पोलीस आले. तोतया पोलिसांच्या ताफ्याने गजानन ब्राह्मणे ची गाडी अडवली ज्यामध्ये गजानन बसला होता .तोतया पोलिसांनी गजाननकडे जाऊन त्याला मारहाण करून गाडीखाली ढकलून पळून गेला. या घटनेची माहिती गजाननने त्याच्या मित्राला दिली. ही घटना कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, त्यामुळे त्यांनी कोंढाळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती रात्री उशिरापर्यंत कोंढाळी पोलीस ठाण्यात देण्यात आली, त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन काटोल उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब-रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळी चे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. राजकुमार त्रिपाठी ए कर्मचारी अधिक तपास करत आहेत.
18लाखाची लूट प्रकरी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी 10डिसेंबर रोजी घटनास्थळी पोहोचले व माहिती घेतली.तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी बापू साहेब-रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळी चे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी, नागपूर जिल्हा गुन्हे शाखेचे अधिकारी यांना आरोपींचे शोधकामी विविध पथके नेमण्यात आली आहे. घटनेतील आरोपींचा शोध सुरू आहे.

