एक ऑगस्ट पासून ‘महसूल सप्ताहा ‘ला सुरुवात कोंढाळी राजस्व मंडळ अंतर्गत विविध योजनांचे ५३ प्रकरणे निकाली
Summary
कोंढाळी राजस्व मंडळ अंतर्गत विविध योजनांचे ५३ प्रकरणे निकाली कोंढाळी -वार्ताहर दुर्गाप्रसापांडे महसूल विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्याची सामाजिक उपयुक्तता, या कामाबद्दल सामान्य नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विविध उपक्रमामार्फत तालुक्यात एक ऑगस्ट पासून सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह राबविण्यात […]
कोंढाळी राजस्व मंडळ अंतर्गत विविध योजनांचे ५३ प्रकरणे निकाली
कोंढाळी -वार्ताहर दुर्गाप्रसापांडे
महसूल विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्याची सामाजिक उपयुक्तता, या कामाबद्दल सामान्य नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विविध उपक्रमामार्फत तालुक्यात एक ऑगस्ट पासून सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे.
कोंढाळी येथील नायब तहसीलदार कार्यालयाचे सभागृहामध्ये मंगळवार एक अगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे, तहसीलदार राजू रणवीर, नायब तहसीलदार संजय भुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली
राज्य शासनाच्या निर्देशानुसार एक ते सात आगस्ट या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर विविध जनजागृतीचे कार्यक्रम या काळात राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना, लाभाच्या योजना विद्यार्थ्यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त, अधिकारी कर्मचारी संवाद ,आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असुन या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व अंमलबजावणी व्हावी, या करिता कोंढाळी नायब तहसीलदार कार्यालया मार्फत एक ऑगस्ट रोजी कोंढाळी मंडळ निरिक्षक सुरज कुमार साददकर सहकारी राजेंद्र सरोदे यांनी उत्पन्नाचे दाखले (२५), फेरफार प्रमाणिकरण (१२),गाव नकाशा (१२),०९/१२नोटीसा(०४) असे एकूण ५३प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे. अशी माहिती मंडळ निरिक्षक सुरज साददकर यांनी दिली आहे.