एक ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह
काटोल,
महाराष्ट्र शासन महसूल विभाग, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या निर्देशां नुसार महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन एक ऑगस्ट महाराष्ट्र दिन ते सात ऑगस्टपर्यंत काटोल नरखेड तालुक्यातील महसूल विभागाद्वारे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा सर्व जनतेने लाभ द्यावा असे विनंती उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे यांनी केले आहे.
उपविभागीय कार्यालयात झालेल्या झालेल्या सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी तहसीलदार राजू रणवीर, तहसीलदार महेश खोडके,. नायब तहसीलदार भागवत पाटील, नायब तहसीलदार संजय भुजाडे, नायब तहसीलदार विजय डांगोरे , नायब तहसीलदार सुनिता चललावार, नायब तहसीलदार गुणवंत भुजाडे, नायब तहसीलदार योगीता डांगोरे, निरीक्षण अधिकारी मोनिका गजभिये उपस्थित होते.
महसूल विभागाच्या वतीने या महसूल सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबवून महसूल विभागाच्या विविध योजना आणि सेवा सुविधांची माहिती जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचावी आणि लोकांमध्ये महसूल विभागाबद्दल अधिक विश्वास निर्माण व्हावा. जनतेची कामे जलद गतीने आणि सुलभ व्हावीत यासाठी महसूल सप्ताह एक ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत आयोजित केला असून जनतेने लाभ द्यावा असे उपविभागीय अधिकारी पियूश चिवंडे यांनी सांगितले.
