एक आवाज मोदी विरोधात उठतो आणि पगारी आयटी सेलची पिल्लावळी विरोधकाचा आवाज दाबण्यासाठी मैदानात ??

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 23 मे. 2021;-
जर तो आवाज गुजरात मधून निघाला तर अंधभक्तांची अवस्था पाहण्यासारखी होते. गुजराती कवियत्री पारुल कक्कड यांनी अवघ्या चौदा ओळींनी स्वयंघोषित विश्व गुरूचे सिंहासन हलवून टाकले आहे . फेसबुकवर लिहिली गेलेली त्यांच्या कवितेवर २८ हजार शिव्यांच्या लाखोली वाहिलेल्या कमेंट्स आल्या आहेत. ह्या कमेंट्स करणारे कोण?? निश्चितच अमित मालवियाच्या हाताखालची भुरटी गँग ……..
कालपर्यंत पारूलजींना गुजरात मध्ये फक्त त्यांनी लिहिलेल्या भजनासाठीच ओळखले जात होते. आता त्यांच्या खाली दिलेल्या कवितेचा देशातील सर्व भाषांमध्ये अनुवाद होऊन व्हायरल होत आहे.
गुजरात मध्ये देखील मृत्यूंच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात अफरातफर केली जातं आहे. मृत्यूंचे खरे आकडे देशासमोर, जगासमोर येऊ दिले जात नाही. परंतु म्हटले जाते की सत्य दाबण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते एक दिवस समोर येतेच.
खोटा प्रचार, महिन्याला भरमसाठ पगार देऊन देशात अराजकता, खोटी माहिती पसरविण्यासाठी निर्माण केलेली आयटीसेल यांनाही राजाचा नागडेपणा लपविता आला नाही. रोज तासातासाला कपडे बदलणा-या राजाचा नागडेपणा देशातील जनतेला दिसु लागला आहे. आय टी सेलच्या जोरावर निर्माण केलेला राजा तर पुर्णपणे खोटा निघाला. राजाचा नागडेपणा दिसु लागला आहे.
हळूहळू सत्य समोर येऊ लागले आहे.
अंगावर काटा येतो हे वाचताना.
गुजराती कवयित्री पारुल खक्कर यांची ही कविता ह्रदयद्रावक आहे आणि टोकदारही. नि:शब्दता. सुन्नता. असा सारा अवकाश आक्रमण करत राहतो आपल्यावर आणि आपण केवळ हतबल…..
● नंगा साहेब
————
एक साथ सब मुर्दे बोले ‘सब कुछ चंगा-चंगा’….
साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा…..
ख़त्म हुए शमशान तुम्हारे, ख़त्म काष्ठ की बोरी
थके हमारे कंधे सारे, आँखें रह गई कोरी…
दर-दर जाकर यमदूत खेले
मौत का नाच बेढंगा….
साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा….
नित लगातार जलती चिताएँ
राहत माँगे पलभर
नित लगातार टूटे चूड़ियाँ
कुटती छाति घर घर
देख लपटों को फ़िडल बजाते वाह रे ‘बिल्ला-रंगा’…
साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा..
साहेब तुम्हारे दिव्य वस्त्र, दैदीप्य तुम्हारी ज्योति..
काश असलियत लोग समझते, हो तुम पत्थर, ना मोती
हो हिम्मत तो आके बोलो
‘मेरा साहेब नंगा’
साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा….
( मूळ गुजराती कवयित्री: पारुल कक्कड / हिंदी भाषांतर : इलियास मन्सूरी)