*एका इसमास पोटावर चाकु मारून गंभीर जख्मी केले* #) फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी चार आरोपीना ताब्यात घेतले.
*नागपूर* कन्हान : – गहुहिवरा रोड वरील हॉटेल मधुन घरी जाताना आोव्हर ब्रिज व टोल नाक्या च्या सर्विस रोड जाताना चार युवकांनी मारहाण करून अंकीत सिंग याच्या पोटावर चाकु मारून गंभीर जख्मी केले. तर फिर्यादी संकेत त्रिवारी ला सुध्दा मारहाण केली. कन्हा न पोलीसानी फिर्यादी च्या तक्रारीवरून तीन युवक व एक विधीसघर्षीत बालकास ताब्यात घेतले.
रविवार (दि.२८) ला १० वाजता दरम्यान फिर्यादी संकेत प्रेमशंकर त्रिवारी वय ३१ वर्ष रा वार्ड क्र ४ जे एन दवाखान्या जवळ कांद्री व पुंडेश्वर उर्फ अंकीत पटेश्वर सिंग वय ४० वर्ष हे गहुहिवरा रोड वरील हॉटेल मधुन आपल्या घरी जात असताना गहुहिवरा ओव्हर ब्रिज कडुन कांद्री टोल नाक्या कडे जाणा-या सर्विस रोडने जाताना यातील आरोपीतानी बिअरची खाली बॉटल पुलावरून खाली फेकली असता यातील जख्मी व फिर्यादी हे दचकले व जख्मी याने म्हटले की किसने बॉटल फेका है. असे विचारले असता पुलावरती अस लेल्यानी “तु आगे आ हम बताते है, किसने बॉटल फे की है ” असे म्हटले व काही अंतरावर पुलाच्या खाली येवुन संगणमत करून शिवीगाळ देऊन चिडुन आरोपी विदीत उर्फ मौसी यांने अंकीत सिंग यास पोटावर चाकुने वार केले. व यातील तिन्ही आरोपीतानी हातबु क्काने मारहाण केली आणि फिर्यादी संकेत त्रिवारी वाचविण्याकरिता गेला असता त्याला सुध्दा दगडाने व हाथबुक्कीने मारहाण केली. कन्हान पोलीसानी फिर्या दी च्या तोंडी रिपोट वरून व जख्मी यांचे डॉक्टर अभि प्रायावरून आरोपी १) विदीत उर्फ मौसी पंजाबराव कोमटी वय २३ वर्ष रा शिवनगर कन्हान २) सुवंश उर्फ जय कुलदिपसिंग खंडुजे वय १८ वर्ष रा शिवनगर कन्हान ३) लक्की अरविंद नाईक वय २० वर्ष रा. अशोक नगर कन्हान ४) विधीसंघर्षीत बालक यांचे विरूध्द कलम ३०७, २९४, ३४ भादंवी नुसार गुन्हा नोंद करून चारही आरोपीना २४ तासात ताब्यात घेत ले. सदर ची कार्यवाही पोलीस अधिक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी बागवान यांचे मार्गद र्शनात कन्हान थानेदार अरूण त्रिपाठी, सपोनि सतिश मेश्राम, नापोशि राहुल रंगारी, पोशि संजय बरोदिया, सुधिर चव्हाण, शरद गिते, विशाल शंभरकर, वैभव बोरपल्ले, मंगेश सोनटक्के, जितेंद्र गांवडे हयानी केली.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147