एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Summary
सागर घोडके/पुणे मावळ मावळ – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कार्ला वेहरगाव येथील कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिर नवरात्रोत्सवा निमित्ताने भाविकांसाठी खुले करण्यात आले.भाविकांची आज गर्दी पाहण्यास आली. रविवार हा सुट्टी चा दिवस व नवरात्रीच्या उत्सवाचे औचित्य साधुन भाविकांनी वेहरगाव […]
सागर घोडके/पुणे मावळ
मावळ – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कार्ला वेहरगाव येथील कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिर नवरात्रोत्सवा निमित्ताने भाविकांसाठी खुले करण्यात आले.भाविकांची आज गर्दी पाहण्यास आली.
रविवार हा सुट्टी चा दिवस व नवरात्रीच्या उत्सवाचे औचित्य साधुन भाविकांनी वेहरगाव येथील कार्ला गडावरील एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. एकुण दिड वर्षे बंद आसलेले मंदिर घटस्थापनेपासुन सुरू झाले, त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आतुरतेने भाविक आज मोठ्या प्रमाणात होते.
कोळी, आगरी, कुणबी समाजाची महाराष्ट्रातील भक्तांची, तसेच ठाकरे घराण्याची कुलदेवत असणाऱ्या एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील भक्त भाविक मोठ्या प्रमाणात येतात.
पर्यटक व भाविक कार्ला परिसरात आल्याने मंदिर गाभाऱ्यापासुन ते कार्ला फाटा व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे मुंबई पुणे महामार्ग काही तास ट्रॅफिक होती.