एकलारीत सामाजिक उपक्रमांसह वाढदिवस सोहळा

भंडारा – शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्था, एकलारीचे सचिव श्री. अनिल मदनरावजी आमटे यांच्या वाढदिवसानिमित्त 8 सप्टेंबर 2025 रोजी (सोमवार) विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
—
कार्यक्रमाचे वेळापत्रक
सकाळी 7.30 वा. – सार्वजनिक हनुमान मंदिर, एकलारी येथे पूजा-अर्चना व वृक्षारोपण.
सकाळी 9.00 वा. – द्वारका धाम {खोडगाव हनुमान मंदिर} मोहगाव देवी येथे स्वच्छता मोहीम, पूजा-अर्चना, आरती आणि वाढदिवस सोहळा तसेच प्रसाद वितरण.
सकाळी 11.30 वा. – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, एकलारी येथे विद्यार्थ्यांना भेटवस्तू वाटप आणि मार्गदर्शन सत्र.
दुपारी 12.00 वा. – एकलारी येथील गारमेंट युनिटला भेट व महापुरुषांचे फोटो वितरण.
दुपारी 12.30 वा. – वृद्धालय आश्रम, भंडारा येथे भेट व नाश्ता वाटप.
दुपारी 2.30 वा. नंतर – वरठी येथील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा उपक्रम.
—
संस्थेचे आवाहन
या सर्व कार्यक्रमांना स्थानिक नागरिक, मित्रपरिवार व इच्छुक व्यक्तींनी उपस्थित राहून सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनिल प्रमिलाबाई तेजरामजी भोयर (मो. 8007551596) यांनी केले आहे.
—