उर्जा विभाग शेतकर्यांचे दारावर अधिकार्यांनी समजावून सांगितले सौर उर्जा चे महत्व महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

कोंढाळी –
नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी वीज उपविभागीयक्षेत्रातील कोंढाळी- काटोल जोड रस्त्यावर कोंढाळी व लगतच्या गावातील अनेक शेतकऱ्यांचे उपस्थितत. वीज विभागाचे अधिक्षक अभियंता राजेश नाईक, तसेच कोंढाळी उप विभागीय वीज अधिकारी यांनी मागेल त्याला सौर ऊर्जा पंपाचे संकल्पने बाबद माहिती दिली. तसेच एक एच. पी. ते साडे सात एच पी. पर्यंत सौर उर्जेवर संचालीत उपकरणांच प्रात्यक्षिक ही करून दाखवले. तसेच या प्रसंगी उपस्थित अल्प भू धारक ते बडे शेतकरी ही उपस्थित होते.
या प्रसंगी महाराष्ट्र शासनाद्वारे आता ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ दिला जात आहे. यासंबंधी अधिकृत अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वतीने करण्यात आली आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना साठी अर्ज देखील आता सुरू झाले आहेत, mahadiscom मार्फत अर्ज करायचा आहे.
नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे आता सर्व इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सौर कृषी पंप भेटणार आहे.
काटोल कोंढाळी सह नागपूर जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा उद्देश या योजनेचा आहे. कृषी पंप पाहिजे असेल, तर तुम्हाला फक्त ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, दुसरं काहीच करण्याची गरज नाही.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र साठी जर तुम्हाला Online ही अर्ज भरू शकता.
अशी माहिती वीज विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिली
या प्रसंगी येथील प्रगतिशील शेतकरी पुरूषोत्तम हागवणे, रुपेश काळबांडे, यादवराव बागडते यांनी सौर उर्जा पंप लावण्याची इच्छा जाहिर केली.
तसेच ग्रामीण भागातील बिहालगोंदी चे शेतकरी रामदास मरकाम, वसंत नगर चे गोपाल राठोड,रतन चव्हाण, जगदिश चव्हाण, बाबा राव रेवतकर,यांनी याबाबत शंका उपस्थित केल्या. त्या शंकांचे समाधान वरिष्ठ अधिकारी. यांनी केले.
या प्रसंगी या भागातील राजेंद्र जाधव, सतीश चव्हाण, प्रमोद वा चापले, रविकांत शिर्के, बाबा शेख,विक्रांत जनई, सुरेंद्र भाजिखाये,स्वप्निल व्यास, पदम डेहनकर, नरेश नागपुरे, प्रकाश बारंगे,बाळासाहेब ढोके,जमीर शेख ,दुष्यांत बालपांडे, इक्बाल शेख, योगराज सिंह ठाकूर,आयुष्य मान पांडे, बंडू जुनघरे, तसेच वीज वितरण विभागाचे प्रणव कुर्रेवार, उपकार्यकारी अभियंता, कोंढाळी उपविभाग,
अमरपाल मून, सहाय्यक अभियंता, कोंढाळी शहर वि. केंद्र, श्रीकांत समऋवार, सहाय्यक अभियंता, कोंढाळी ग्रामीण १ वि. केंद्र.,प्रल्हाद ओमकार, सहाय्यक अभियंता, कोंढाळी २ वि. केंद्र. दिपक घोडके, सहाय्यक अभियंता, बाजारगाव वि. केंद्र, आशिष कुलसंगे, सहाय्यक अभियंता, रिधोरा वि. केंद्र. दुष्यंत बालपांडे, कोंढाळी
. शेख जमीर, कोंढाळी. सह अनेक शेतकरी उपस्थित होते.