BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

उभ्या ट्रकला मागुन धडक मारल्याने एकाचा मुत्यु

Summary

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्व ०४ किमी अंतरावरील नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग बॉय पास चारपदरी रोड कन्हान वरील कुंभलकर ढाबाच्या समोर ट्रक चालकाने आपले वाहन लापवाहीने चाल वुन महामार्गावर उभ्या ट्रकला मागुन धडक मारून केलेल्या अपघातात अभिषेक पाल […]

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्व ०४ किमी अंतरावरील नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग बॉय पास चारपदरी रोड कन्हान वरील कुंभलकर ढाबाच्या समोर ट्रक चालकाने आपले वाहन लापवाहीने चाल वुन महामार्गावर उभ्या ट्रकला मागुन धडक मारून केलेल्या अपघातात अभिषेक पाल यांचा घटनास्थळी च मुत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.९) ऑगस्ट २०२१ ला रात्री १:१५ ते १:३० वाजता दरम्यान बिपिन कुमार सुरेशचंन्द्र पाल वय ३९ वर्ष रा कटरा ता सिकंद रा जि. कानपुर नगर ( उ.प्र) हे एक ट्रक ड्रयव्हर असु न ते हरियाणा येथुन माल घेऊन हैद्राबाद ला त्याचा पुतण्या सह व विनीतकुमार रामसेवक अवस्थी वय ३८ वर्ष राह. सरैय्या पोस्टे श्रीनगर ता घाटमपुर जि. कानपुर (उ प्र) आणि त्याचा मित्रासह ट्रक क्र. टी एस ०३ युसी २१२९ ने जात असतांना देवलापार जवळ ढाब्यावर जेवन करून विनीतकुमार अवस्थी ला ट्रक चालवण्याकरिता दिला असता नागपुर जबलपुर राष्ट्री य महामार्ग बॉयपास चारपदरी रोड कन्हान वरील कुंभलकर ढाब्या समोर ट्रक चालकाने आपले ताब्या तील वाहन लापवाहीने व निष्काळजीने चालवुन महा मार्गावर उभ्या ट्रकला मागुन धडक मारून कंडक्टर बाजुला बसलेला पुतन्या अभिषेक कुमार पाल वय १९ वर्ष राह कटरा यांचे मरणास कारणीभुत ठरल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी बिपीनकुमार पॉल च्या तक्रारी वरून आरोपी ट्रक चालक विनीतकुमार अवस्थी विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० कलम २७९ , ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करून तपासात घेत आरोपीचा शोध करित असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख हे करीत आहे.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *