उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार चिमूर यांचा भ्रष्टाचार

चंद्रपूर :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 23.मे.2021
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुरडी येथील रेती तस्करी प्रकरणात गावकऱ्यांनी एक ट्रॅक्टर पकडून कैलास भोयर यांनी चिमूर एसडीओ साहेबांना फोन करून माहिती दिली. साहेब म्हणाले कर्मचाऱ्याला पाठवतो, तुम्ही ट्रॅक्टर पकडून ठेवा. दोन तास होऊन सुद्धा साहेब जागेवर आलेच नाही . कर्मचारीही आले नाही. आश्चर्य म्हणजे रेती तस्करी करणाऱ्याच्या महिला त्या ठिकाणी हजर झाल्या व त्यांनी ट्रॅक्टर पकडणाऱ्या व्यक्तीवर जाऊन पडल्या . तसेच पोलीस स्टेशनला तक्रार करण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारावरून उपविभागीय अधिकारी यांनी अगोदरच रेती तस्करांना हुशार करून गावकऱ्यांना खोट्या प्रकरणात फसविण्याचे षडयंत्राचे कटकारस्थान करीत आहे. वारंवार तक्रारी करून सुद्धा उपविभागीय अधिकारी व संबंधित अधिकारी रेती तस्करांवर कोणत्याही कारवाई का करीत नाही ? रेती तस्करां सोबत या अधिकारी कर्मचाऱ्यांचे काय संबंध आहेत ? याची खमंग चर्चा सर्वत्र होत आहे. याबाबत भारतीय क्रांतीकारी संघटना शाखा चिमूर च्या वतीने सोमवारला उपविभागीय अधिकारी चिमूर तसेच तहसीलदार चिमूर यांना निवेदन देऊन तहसील कार्यालय चिमूर समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येणार आहे. तेव्हा धरणे आंदोलनाच्या अगोदरच रेती तस्करी वर आळा घालावा …