महाराष्ट्र हेडलाइन

उपमुख्याध्यापक बबनराव तागडे सेवानिवृत्त विपरीत परिस्थिती ला सामोरे जात शैक्षणिक प्रवास दोन वर्ष मराठवाडा विद्यापीठ नामांतर काळात शिक्षणात व्यत्यय निरोप व सत्कार समारंभ

Summary

काटोल-प्रतिनिधी दुर्गाप्रसाद पांडे कोंढाळी येथील लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक बबनराव तागडे दिनांक 31 मार्चला सेवानिवृत्त झाले. त्यांचे शिक्षक ते उपप्राचार्य अशी 31 वर्ष 8 महिने प्रदीर्घ सेवा ठरली. त्यांचा निरोप समारंभ संस्थेचे वतीने पार पडला . यावेळी […]

काटोल-प्रतिनिधी दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी येथील लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक बबनराव तागडे दिनांक 31 मार्चला सेवानिवृत्त झाले. त्यांचे शिक्षक ते उपप्राचार्य अशी 31 वर्ष 8 महिने प्रदीर्घ सेवा ठरली. त्यांचा निरोप समारंभ संस्थेचे वतीने पार पडला . यावेळी प्राचार्य गणेश शेंभेकर, पर्यवेक्षक श्रीमती शालिनी इंगळे, जेष्ठ शिक्षक सुधीर बुटे, निरंजन अंजनकर, संजय आगरकर,अशोक वानखेडे, विजय दुपारे, कैलास थुल, सुनील सोलव, लक्ष्मण बोलके, सौ दुर्गा भट्टड, सौ पुष्पा बारई, यादव पंधराम, आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य शेंभेकर यांनी तागडे दांपत्य बबनराव ( विश्वनाथ) व वसुंधरा यांचा शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. हलाखीचे परिस्थिती जन्मगाव नांदोरा खेडेगावातून 4 की मी पायदळ कोंढाळी येथे शिक्षण केल्यानंतर मिलिंद कनिष्ठ महाविद्यालय औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ नामांतर वेळी शिक्षणात व्यत्यय येऊन दोन वर्षे वाया गेले.अनेक संकटांशी सामना करीत पदवी ,पदवीत्तर, शैक्षणिक पात्रता प्रथम श्रेणीत पूर्ण करून कोंढाळी जन्म भूमीत नोकरीची 1989 ला संधी मिळाली. इतिहास, इंग्रजी, स्काऊट गाईड, विषयावर अध्यापन केले. नागपूर शालांत बोर्ड परीक्षा मंडळाचे माध्यमातून व्हॅल्यूअर, मॉडरेटर, मूल्यमापन आराखडा, आदी महत्वाची जबाबदारी पार पडली. यशदा पुणे राज्य स्तर तज्ञ मार्गदर्शक,, शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षक आदी भूमिका पार पाडल्या. आदर्श शिक्षक पुरस्कार, मुबंई, पुणे व नागपूर येथे समाज कार्य, कर्तृत्ववान आदी पुरस्कार मिळाले.त्यांचे जीवन कार्यावर जेष्ठ शिक्षक सुधीर बुटे यांनी प्रास्ताविका मधून प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचलन परीक्षा विभाग प्रमुख संजय आगरकर, काव्यातून परिचय प्रा निरंजन अंजनकर तर आभार सुनील सोलव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *