पुणे महाराष्ट्र हेडलाइन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Summary

पुणे दि.२० :- भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. तसेच उपस्थितांना सद्भावना दिवसानिमित्त प्रतिज्ञाही दिली. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]

पुणे दि.२० :- भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. तसेच उपस्थितांना सद्भावना दिवसानिमित्त प्रतिज्ञाही दिली.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार सुनील शेळके, आमदार सुनिल टिंगरे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *