उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बोराडे कुटुंबियांचे सांत्वन
Summary
छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका): उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य दिवंगत रा. रं. बोराडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. प्राचार्य बोराडे यांच्या निधनानंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार आज छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. प्राचार्य बोराडे यांच्या […]

छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका): उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य दिवंगत रा. रं. बोराडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
प्राचार्य बोराडे यांच्या निधनानंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार आज छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. प्राचार्य बोराडे यांच्या विद्यानिकेतन कॉलनी येथील ‘शिवार’ या निवासस्थानी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व विचारपूस केली. प्राचार्य बोराडे यांच्या पत्नी सुलभा बोराडे, कन्या प्रेरणा दळवी, तृप्ती इंगळे, हर्षवर्धन दळवी, पृथ्वी इंगळे, आदित्य जगताप, पुतणे संजय बोराडे, अनिरुद्ध पाटील हे बोराडे यांचे कुटुंबिय तसेच आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे यावेळी उपस्थित होते.
०००