उद्यापासून 15 दिवस महाराष्ट्रात संचारबंदी, काय सुरु, काय बंद राहणार राज्यात संचारबंदीचे आदेश लागू असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर कडक लॉकडाऊनची घोषणा केलीय. या लॉकडाऊनला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक द चेन असं नाव दिलं आहे. त्यानुसार उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्यात पुढील 15 दिवस कलम 144 लागू राहणार आहे. त्यानुसार राज्यात संचारबंदीचे आदेश लागू असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक बाब आहे.
🪀 उद्या संध्याकाळपासून ‘ब्रेक द चेन’
🪀 राज्यात 144 कलम लागू पुढील १५ दिवस राज्यात संचारबंदी आदेश लागू असतील.
🪀अनावश्यक कारणांसाठी नागरिकांचं बाहेर फिरणं पूर्णपणे बंद असणार
🪀 सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होणार नाही. त्या अत्यावश्यक कामांसाठीच वापरल्या जातील. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांच्या प्रवासासाठी त्या सुरु ठेवण्यात येतील. त्यामध्ये रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, वैद्यकीय कच्चा माल निर्मिती करणारे कर्मचारी, जनावरांचे दवाखान्यातील कर्मचारी, शितगृहे, वेअर हाऊसिंग, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, सर्व बँका, सेबी, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, दूरसंचार सेवा, ई-कॉमर्स, अधिस्विकृतीधारक पत्रकार, पेट्रोल पंप सुरु राहतील, शासकीय आणि खासगी सुरक्षा मंडळे, आयटी सेवा सुरु राहतील
शक्य असेल तर कर्मचाऱ्यांची व्यवस्था करा
🪀बांधकाम, अन्य उद्योगांना सांगतो की, तुमच्या साईट्सवर शक्य असेल तर तिथेच तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय करा, त्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्या. तुमच्या कँम्पसमध्ये सुविधा नसतील तर कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्याचं आवाहन
🪀 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सची होम डिलिव्हरी, टेक अवे सेवा सुरु
हॉटेल्स रेस्टॉरंट्सवर पुर्वीप्रमाणेच निर्बंध, टेक अवे, होम डिलिव्हरी सेवा सुरु राहतील. रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांनाही परवानगीय. पण त्यांनीही पार्सल व्यवस्थाच सुरु ठेवावी.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर