BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ महाराष्ट्र हेडलाइन

उत्तरप्रदेश हाथरस मध्ये झालेल्या मनिषा वाल्मिक यांच्या हत्याकांडातील आरोपीला फाशी देवुन दोषी अधिका-यावर कार्यवाही करण्यात यावी

Summary

आजच्या काळात बलात्कार सारखे गुन्हे होणे फार शोकाची बाब आहे. ज्या समाजात दावा करतात की महिलांना समान दर्जा आहे. तर असे प्रकरण होणे फार गंभीर बाब आहे. महिलांच्या सुरक्षितेचा दावा प्रशासन व सरकार करतात तर असे बलात्कार कु्र कृत्य होणे आजच्या काळात खुप शोकाची बाब आहे…

आज दिनांक 2/10/2020 ला देसाईगंज शहरात उत्तरप्रदेश हाथरस मध्ये दलित समाजातील मनिषा वाल्मिक यांच्यावर बलात्कार करून क्रुर कृत्य करून अमानुष रित्या हत्या करण्यात आली. याच उद्देश्यांने देसाईगंज शहराच्या तालुका महिला कॉंग्रेस अध्यक्ष आरती लहरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, अल्पसंख्याक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे शहरात निषेध करण्यात आला आहे. आजच्या बदलत्या काळात बलात्कार सारखे गुन्हे होणे फार शोकाची बाब आहे. ज्या समाजात दावा करतात की महिलांना समान दर्जा आहे. तर असे प्रकरण होणे फार गंभीर बाब आहे. महिलांच्या सुरक्षितेचा दावा प्रशासन व सरकार करतात तर असे बलात्कार कु्र कृत्य होणे आजच्या काळात खुप शोकाची बाब आहे. बलात्कार सारख्या प्रकरणाला आळा बसला नाही तर महिला कधीच सुरक्षित राहणार नाही, म्हणुन आरोपीला तात्काळ फाशी देवुन बेजवाबदार अधिका-यांना जे आरोपीला मदत करतात. अशा अधिका-यावर कायदेशिर कार्यवाही ताबडतोब करण्यात यावी. अशी मागणी ता. देसाईगंज कॉंग्रेस कमिटीच्या वतिने जोरदार निर्दशने करण्यात आले.
यावेळी उपस्थित तालुका कॉंग्रेस अध्यक्ष परसराम टिकले, शहर अध्यक्ष पिंटु बावणे, महिला कॉंग्रेस अध्यक्ष आरती लहरी, अल्पसंख्याक प्रदेश सचिव शहजाद शेख, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष लतिफ रिजवी, नगरसेवक आरीफ खानानी, नगरसेवक हरिश मोटवानी, नगरसेवक गणेश फाफट, नरेंद्र गजपुरे, कमलेश बारस्कर, मिलींद सपाटे, सुनिल सहारे, मंगला चुंगडे, सायली रामटेके, विनायक वाघाडे, राजेंद् बुल्ले आदि पक्ष कार्यकते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
तसेच देसाईगंज तालुका कॉंग्रेस कमिटिच्या वतीने आलेल्या निर्देर्शनात उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर हल्ला चढवत या प्रकरणातील मयत मनिषा वाल्मिकच्या हत्यारांना मदत करणा-या प्रशासन अधिका-यावर तात्काळ कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी. यावेळी मयत मनिषा वाल्मिकच्या परिवाराला सांत्वन देण्यासाठी व भेटण्यासाठी मा. खासदार राहुल गांधी यांना धक्का बुक्की करणा-या पोलीस अधिकारी कर्मचा-यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्याबद्दल दलित परिवारातील गरीब तरूणीची हत्या करूनही कार्यवाही करण्यात कुचराई करणा-या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निर्देशने करून जाहीर निषेध करण्यात आला.

मंगला गिरीश चुंगडे
महिला न्युज रिपोर्टर
वडसा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *