महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Summary

मुंबई, दि. 12 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील श्री. खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील सुवर्णयुग […]

मुंबई, दि. 12 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील श्री. खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्लीला द्वितीय आणि मुंबई उपनगरच्या अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळाला तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

याशिवाय 27 जिल्हास्तरीय विजेते घोषित करण्यात आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

अ.क्रंजिल्हासार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव1अमरावतीएकविरा गणेशोत्सव मंडळ2औरंगाबादकुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ3बीडजय किसान गणेश मित्र मंडळ4भंडाराआदर्श गणेश मंडळ5बुलढाणासहकार्य गणेश मंडळ, तालुका चिखली6चंद्रपूरन्यु इंडिया युवक गणेश मंडळ, भानापेठ वार्ड7धुळेश्री. संत सावता गणेश मित्र मंडळ, सोनगीर8गडचिरोलीलोकमान्य गणेश मंडळ, आरमोरी9गोदिंयानवयुवक किसान गणेश मंडळ, देवरी10हिंगोलीश्री. सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एनटीसी11जळगांवजागृती मित्र मंडळ, भडगांव12जालनासंत सावता गणेश मंडळ, परतूर13कोल्हापूरश्री. गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी14लातूरबाप्पा गणेश मंडळ15मुंबई शहरपंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ना.म.जोशी.मार्ग16नागपूरविजय बाल गणेशोत्सव मंडळ, किराडपुरा17नांदेडअपरंपार गणेश मंडळ18नंदुरबारक्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ19नाशिकअमरज्योत मित्र मंडळ, सातपूर20उस्मानाबादबाल हनुमान गणेश मंडळ21पालघरसाईनाथ मित्र मंडळ, नालासोपारा22परभणीस्वराज्य गणेश मंडळ, देवनांदरा23पुणेजयजवान मित्र मंडळ, नानापेठ24रायगडसंत रोहीदास तरुण विकास मंडळ, महाड25रत्नागिरीपालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मंडणगड26सांगलीतिरंगा गणेशोत्सव मंडळ, विटा27सातारासार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली28सिंधुदुर्गसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवडा29सोलापूरश्रीमंत मानाचा कसबा गणपती30ठाणेधामणकर नाका मित्र मंडळ, भिवंडी31वर्धाबाल गणेश उत्सव मंडळ, समुद्रपूर32वाशिममंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ33यवतमाळनवयुग गणेश मंडळ

गणेशोत्सव काळात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत जिल्हयातून एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तर समितीमार्फत प्रत्येकी एक याप्रमाणे प्राप्त झालेल्या एकूण 36 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रूपये आणि प्रमाणपत्र तसेच 33 जिल्हयातील अन्य प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसही 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *