उत्कृष्ट व समाधानी ग्राहकां मुळेच पतसंस्थेची प्रगती अनिल पाटील म्हशाखेत्री पतसंस्थेच्या वतीने उत्कृष्ट ग्राहकांचा सत्कार
Summary
ज्या पतसंस्थेत समाधानी ग्राहकांची संख्या जितकी जास्त, तितकी त्या संस्थेला दीर्घकालीन व शाश्वत यश मिळण्याची संधी जास्त असते. दी गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेला सुरुवातीपासूनच उत्कृष्ट व समाधानी ग्राहकांची साथ लाभल्यामुळे तिची उत्तरोत्तर प्रगती होत गेल्याचे गौरवोद्गार दि गडचिरोली नागरी सहकारी […]
ज्या पतसंस्थेत समाधानी ग्राहकांची संख्या जितकी जास्त, तितकी त्या संस्थेला दीर्घकालीन व शाश्वत यश मिळण्याची संधी जास्त असते. दी गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेला सुरुवातीपासूनच उत्कृष्ट व समाधानी ग्राहकांची साथ लाभल्यामुळे तिची उत्तरोत्तर प्रगती होत गेल्याचे गौरवोद्गार दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री अनिल पाटील म्हाशाखेत्री यांनी पतसंस्थेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून काढले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पतसंस्थेच्या मानद सचिव श्रीमती सुलोचनाताई वाघरे, ज्येष्ठ संचालक पंडित पुडके उपस्थित होते.
अनिल पाटील पुढे म्हणाले , दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना 28 जून 1993 रोजी झाली असून संस्थापक अध्यक्ष स्व . चुडाराम मुनघाटे,संस्थापक मानद सचिव स्व. खुशालराव वाघरे विद्यमान संचालक मंडळ व सेवक वर्ग यांच्या अथक परिश्रमातून ही पतसंस्था अगदी कमी कालावधीत नावारूपास आली. आज या पतसंस्थेच्या जिल्ह्यात ९ शाखा असून सर्व शाखा सीबीएस प्रणालीने जोडल्या आहेत. ग्राहक सेवेचा दर्जा पाहून संस्थेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO 9001-2015 हे मानांकन सुद्धा प्राप्त झाले आहे.
मागील पाच वर्षाच्या काळात ( २०१७-१८ ते २०२३-२४ ) संस्थेचे अधिकृत भाग भांडवल 2 कोटी वरून 5.39 कोटी वर गेले. एकूण ठेवी 49.62 कोटीवरून 117.85 कोटीवर पोहोचल्या, एकूण गुंतवणूक 33.33 कोटीवरून 56.42कोटीवर पोहोचली. कर्ज वाटप 31.30, कोटीवरून 100.18 कोटीवर पोहोचले. संस्थेचा स्वनिधी 12.04 कोटी वरून 25 कोटीवर पोहोचला आहे. वरील आकडेवारीवरून संस्थेचा आर्थिक पाया अत्यंत भक्कम असून, संस्थेची आर्थिक भरभराट झालेली दिसून येते.
संस्थेच्या उत्तरोत्तर आर्थिक वाटचालीबद्दल संस्थेला सलग दोनदा 2022 व 2023 चा बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच विदर्भ क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन लिमिटेड अमरावती तर्फे ” गडचिरोली जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने” वेळोवेळी सन्मानित केले असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी श्री अनिल पाटील यांचा 62 वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. तसेच शाल व श्रीफळ देऊन संचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ठ ग्राहक म्हणून शंकर रामजी काळे,मोतीराम बळीराम हजारे,प्रभाकर कचरुजी भोगे,विश्वजीत अनिल मंडल यांचा व उत्कृष्ट अभिकर्ता म्हणून प्रकाश पायाळ व तेजराम घुबळे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ संचालक पंडित पुडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . तसेच संस्थेचे ग्राहक व हितचिंतक शंकरराव काळे व मोतीराम हजारे यांनी संस्थेची विश्वासाहर्ता वाढत असल्याबद्दल व संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा शेषराव येलेकर, संचालन शाखा व्यवस्थापक भूषण रोहनकर तर उपस्थितांचे आभार संस्थेचे संचालक दिलीप उरकुडे यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे संचालक किशोर मडावी, मुकुंद म्हशाखेत्री, पांडुरंग चिलबुले, संध्या खेवले, राजेंद्र हीवरकर, इश्र्वरदास राऊत,संस्थेचे व्यवस्थापक लिंगाजी मोरांडे तसेच संस्थेचे सभासद अभिकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.