उठा उठा दिवाळी आली, बाबासाहेबांच्या उपकाराने भेटलेला बोनस, घेण्याची वेळ आली.

इंग्रजांच्या पगार नियमानुसार चार आठवड्यांचा “एक” महिना धरला असता एका वर्षात १३ पगार मिळायलाच हवे होते, पण असं न होता एका वर्षात फक्त १२ पगारच मिळत असे. ही बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आली.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारशी पत्रव्यवहार करून हा सर्व गोष्टींची जाणीव करून दिली. जर १३ वा पगार म्हणजे आताचा आपण ज्याला “बोनस” म्हणतो ते नाही मिळाले, तर आंदोलन करू, असाही इशारा त्या पत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारला दिला.
त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे सुचविले की, भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे “दिवाळी”; तर १३ वा पगार म्हणजेच “बोनस” दिवाळीलाच देण्यात यावा. त्यांच्या पत्राचा विचार करून ब्रिटिश सरकारने ३० जून १९४० साली भारतात “बोनस”* हा कायदा लागू झाला.
सर्व भारतीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!