*उखर्डा गावात पाण्यासाठी भटकंती* *पाणी टाकीचे काम पूर्णत्वास गेले तरी नागरिक पाण्याविनाच*
वरोरा- वरोरा तालुक्यातील उखर्डा गटग्रामपंचायतीत केळी हा गाव अंतर्भूत असून लोकसंख्या 578 आहे.20 हजार लिटर ते 25 लिटर क्षमतेची दोन पाण्याची टाकी असून,पाणीपुरवठा पुरेसा होत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना मुख्यत्वे करून महिलांना भटकंती व पायपीट करावी लागत आहे.पाणीपुरवठा योजना सुरू आहे परंतु,काही नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहचत नाही. नागरिकांचे घरापर्यंत पाणी पोहचण्यासाठी उचित कारवाही करण्यासाठी सरपंचांना ग्रामस्थांनी निवेदन सादर केले आहे.
उखर्डा गावात जुनी25 हजार लिटर क्षमतेची व दुसरी नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या पाण्याची टाकी क्षमता 20 हजार लिटर असून सुद्धा गावात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. परंतु,दिवसेदिवस गावाची लोकसंख्या वाढत असल्यामुळे 60 जुने कनेक्शन असून,नव्याने 50 कनेक्शन आहे.त्यामुळे पाणीटंचाई भासू नये यासाठी नवीन पाणी टाकी बांधकामासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामीण पाणीपुरवठा विभाग चंद्रपूर यांचेकडे पाठपुरावा केला ,व नवीन पाणी टाकी मंजूर करून घेतली.दोन वर्षांपूर्वी पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे परंतु,नवीन कनेक्शन धारकांना पाणी पोहचावे यासाठी पाईप लाइन टाकण्याचे काम सुद्धा पूर्ण झाले असून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली नाही.याबाबत अभिजित कुडे यांनी सरपंच रुपाली ठाकरे व सचिव पंकज थुल यांना निवेदन सादर केले आहे.सदर समस्या मार्गी लागली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.निवेदन देतांना रंजित कुडे,रोशन भोयर,विनोद कुडे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दोन्ही टाकीतून पाणीपुरवठा होत आहे.परंतु गावामध्ये जवळपास 25 मोटारी सुरू आहे.त्यामुळे पाण्याचा स्रोत कमी झाला आणि काही नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहचत नाही.ज्या नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहचत नाही त्याची व्यवस्था व समस्या सोडविण्यास ग्रामपंचायत सरपंचा या नात्याने कटिबद्ध आहो.
सरपंचा
रुपाली ठाकरे
ग्रा.प.उखर्डा
आम्हाला पाणी द्याहो,पाणी द्या
कडक उन्हाची चाहूल लागली ,पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास गेली असतांना ती कार्यान्वित👌🏽 होण्यासाठी प्रशासनाची दिरंगाई होत आहे.परंतु,पाण्याची कळ मात्र नागरिकांना सोसावी लागत आहे. किंबहुना महिलांना पाण्यासाठी भटकंती व पायपीट करावी लागत असून,आम्हाला पाणी द्याहो पाणी द्या अशी वेळ आली असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535