ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
Summary
मुंबई, दि. २२ : राज्यपाल रमेश बैस यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात प्रार्थना, उपवास आणि दानपुण्याच्या माध्यमातून अंतर्मन शुद्धीला महत्व दिले गेले आहे. आत्मकल्याणातून विश्वकल्याणाचा प्रशस्त मार्ग दाखवणारा हा महिना आहे. ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, […]
मुंबई, दि. २२ : राज्यपाल रमेश बैस यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात प्रार्थना, उपवास आणि दानपुण्याच्या माध्यमातून अंतर्मन शुद्धीला महत्व दिले गेले आहे. आत्मकल्याणातून विश्वकल्याणाचा प्रशस्त मार्ग दाखवणारा हा महिना आहे. ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो व परस्पर बंधुभाव वृद्धिंगत करो अशी प्रार्थना करतो व सर्वांना, विशेषतः मुस्लिम बांधवांना ‘ईद मुबारक’ देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
000