ईद-उल-अजहा (बकरा ईद) साठी शांतता समितीची बैठक

कोंढाळी – वार्ताहर
देशात 07 जून रोजी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण साजरा केला जाणार आहे.
या सणानिमित्त कोंढाळी पोलीस ठाण्याच्या परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 03-07-2025 रोजी सायंकाळी 07-30वाजता कोंढाळी पोलीस स्टेशन च्या परेड ग्राउंडवर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली . ही बैठक कोंढाळी चे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. येत्या शनिवारी ईद-उल-अजहा (बकरा ईद) निमित्त कोंढाळी पोलीस ठाण्याच्या परिसरातील सर्व गावांमध्ये शांतता, सुव्यवस्था, बंधुभाव, बिघडू नये, कोणत्याही व्यक्तीने अफवा पसरवू नयेत आणि कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे शांतता समितीच्या बैठकीत काटोल चे उप विभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब-रोहोम यांच्या अध्यक्षतेखाली बापूसाहेब रोहम यांनी आवाहन केले. शांतता कमेटी चे बैठकी प्रसंगी डॉ आर पठाण,शेख नूर महंमद, याकूब पठाण, सुफी साबरी नूरी, अफसर हुसेन, प्राचार्य सुधीर बुटे, प्रा. मोहनराव ठवळे, बाल किसन पालीवाल, बब्लू बिसेन,प्रज्वल धोटे, तन्वीर शेख,सदाप पठाण, दुर्गा प्रसाद पांडे तसेच सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांचे सदस्या, पाच ही मशीद कमेटी चे पदाअधिकारी, आणि उपस्थित असलेल्या सदस्यांकडून समस्या जाणून घेतल्या.या समस्यांवर चर्चा केली आणि बकरी ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले. यावेळी कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी,पीएसआय धवल देशमुख,.पो.उ.नि.शेख सलीम,.पो.नि रोशन खांडेकर हे देखील उपस्थित होते. ना पो शि अमित पवार यांनी यांनी उपस्थितांचे आभार मानले.